जवळाबाजारच्या आठवडी बाजारात चोरीच्या शेळ्या विकण्याचा प्रयत्न: तिघे पोलिसांच्या ताब्यात; पावने चार लाखांचा मुद्देमाल जप्त – Hingoli News

जवळाबाजारच्या आठवडी बाजारात चोरीच्या शेळ्या विकण्याचा प्रयत्न:  तिघे पोलिसांच्या ताब्यात; पावने चार लाखांचा मुद्देमाल जप्त – Hingoli News



औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील आठवडी बाजारात रविवारी ता. १९ दुपारी चोरीच्या शेळ्या विक्री करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या ७ शेळ्यांसह ३.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयातील आठवडी बाजारांमधून चोरीच्या वाढत्या घटनांना आवर घालण्यासाठी प्रत्येक आठवडी बाजारात पोलिसांची गस्त सुरु ठेवण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आठवडी बाजारात येणाऱ्या संशयीतांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, आज जवळा बाजार येथील आठवडी बाजार असल्यामुळे औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी पोलिसांचे पथक पाठविले होते. यामध्ये उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार राजेश ठाकूर, दिलीप नाईक, विष्णू चव्हाण, वसंत चव्हाण, दिनकर पोले, आंबादास बेले यांचे समावेश होता. या पथकाने आठवडी बाजारात पाहणी केली असता तिघे जण शेळ्या विक्रीसाठी आल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. शेळ्या कोठून आणल्या याची माहितीही त्यांना देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांची नांवे अजय पवार (रा. बोरी, जि. परभणी), कार्तिक पवार (रा. दुसरबीड जि. बुलढाणा), आदित्य भोसले (रा. डोणगाव जि. बुलढाणा) असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी दुसरबीड येथून शेळ्या चोरी करून विक्रीसाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी सात शेळ्यासह एक वाहन असा ३.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी यापुर्वी जनावरे चोरीचे गुन्हे केले आहेत काय याचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »