चिमुरड्यांच्या जीवाशी खेळ: अंगणवाडीच्या आहार पाकिटात मृत पक्षी…, नाशिक जिल्ह्यात देवगावातील धक्कादायक प्रकार – Nashik News

चिमुरड्यांच्या जीवाशी खेळ:  अंगणवाडीच्या आहार पाकिटात मृत पक्षी…, नाशिक जिल्ह्यात देवगावातील धक्कादायक प्रकार – Nashik News



शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत लहान बालके, गर्भवती व स्तनदा मातांना पोषण आहाराच्या माध्यमातून सकस आहार उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, निफाड-1 प्रकल्पांतर्गत देवगाव बिट क्र. 2 मधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून वितरित केलेल्या पोषण आहार पाकिटात कुजलेला मृत पक्षी आढळल्याचा आरोप लाभार्थीने केला आहे. या घटनेने लाभार्थी पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. येथील प्रशांत कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकदेव सदाशिव माळी यांची मुले आराध्या व आदित्य हे संबंधित अंगणवाडी केंद्राचे लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांना घरपोच दिलेले पोषण आहाराचे बंद पाकीट उघडताच त्यात कुजलेल्या अवस्थेतील मृत पक्षी आढळला. या कुटुंबीयांनी तातडीने संबंधित अंगणवाडी सेविका व अधिकाऱ्यांना माहिती दिली. हा प्रकार एखाद्या एकट्या लाभार्थीपुरता मर्यादित आहे की इतर पाकिटांमध्येही अशाच प्रकारची त्रुटी आहे, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. घटनेनंतर लाभार्थी पालकांनी संबंधित पोषण आहाराचा संपूर्ण साठा जप्त करून त्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी, उत्पादन संस्था, पुरवठादार आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. महिला व बाल विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून वस्तुस्थिती जाहीर करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. मृत पक्षी आढळला, संबंधित विभागाने चौकशी करावी अंगणवाडीतून माझ्या मुलांना दिलेल्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळला. याबाबत संबंधित विभागाने चौकशी करावी. -सुकदेव माळी, लाभार्थी, लासलगाव

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »