तिवसा येथील जबरी चोरीचा 24 तासांत छडा: शेतकऱ्याला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक, गुन्हा दाखल – Amravati News

तिवसा येथील जबरी चोरीचा 24 तासांत छडा:  शेतकऱ्याला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक, गुन्हा दाखल – Amravati News



तिवसा पोलिसांनी ममदापूर-वरखेड फाटा मार्गावर एका शेतकऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोटारसायकल लुटणाऱ्या आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. या जबरी चोरीचा छडा लावत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. ठाणाठुनी येथील ६० वर्षीय शेतकरी प्रकाश महादेवराव दहाट हे १७ जुलै रोजी दुपारी त्यांच्या एमएच-२७ डीएस-८६१२ क्रमांकाच्या मोटारसायकलने जात असताना ही घटना घडली. त्यांच्या मोटारसायकलवर मागे बसलेला आरोपी आदर्श गेडाम (वय २४, रा. ठाणाठुनी, ता. तिवसा) याने ममदापूर फाट्याजवळ वाहन थांबवण्यास सांगितले. वाहन थांबताच आरोपीने प्रकाश दहाट यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील १० हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावली. यानंतर आरोपीने सुमारे ८० हजार रुपये किमतीची मोटारसायकल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तिवसा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(४) व ३०९(६) अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच तिवसा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी आदर्श गेडाम याचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीकडून लुटीतील मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून, तिवसा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp