धक्कादायक: वाशी तालुक्यात शालेय पोषण आहाराच्या सोयाबीन वडीत आढळल्या अळ्या; 301 विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ – Dharashiv News

धक्कादायक:  वाशी तालुक्यात शालेय पोषण आहाराच्या सोयाबीन वडीत आढळल्या अळ्या; 301 विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ – Dharashiv News



18 मुलांना शिजवून देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात अळ्या असल्याचा गंभीर प्रकार शनिवारी(दि.18) तालुक्यातील पारा जिला परिषद शाळेत घडला. या बाबत पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर रात्री साडेआठ वाजता अन्न व औषध प्रशासनाचे पथक दाखल होऊन शाळेत असलेल्या व विद्यार्थ्यांच्या डब्यातील अन्न पदार्थाचे नमुने घेतले आहेत. पारा जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून भात वाटप करण्यात आला होता. ज्यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या कडधान्य व इतर गोष्टी टाकण्यात आल्या होत्या. एकूण 301 विद्यार्थ्यांना या खाऊचे वाटप करण्या आले होते. शनिवार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी मिळालेला भात डब्यात घेऊन घरी गेले. दुपारी शाळेतीलच भात खाण्यासाठी घरी डबा उघडला असता पालकांना त्यामध्ये अळ्या दिसून आल्या या बाबत पालकांनी शाळेशी संपर्क करत या बाबत जाब विचारला. निघालेल्या अळ्या या भातामध्ये टाकण्यात आलेल्या सोयाबीन वडीच्या आत असल्याने त्या दिसून येत नव्हत्या. सोयाबीन वडी शिजवल्यानंतर देखील त्या आतमध्ये मरत असल्याने त्या दिसून येत नाहीत. मात्र सोयाबीन वडी फोडल्यास प्रत्येक वडी मध्ये अळ्या निघाल्या. रात्री साडे आठ वाजता अन्न व औषध प्रशासनाने पारा जिल्हा परिषद गाठत सर्व नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
तालुक्यात एकूण 92 शाळांना झाला आहे पुरवठा मागील महिन्यात 15 तारखेला सुरू झालेल्या आहेत. ज्यामध्ये 68 शाळा या जिल्हा परिषदेच्या तर 24 अनुदानित अशा एकूण 92 शाळांना जुन महिन्यात जुन व जुलै या दोन महिन्याच्या शालेय पोषण आहारातील तांदूळ,मटकी,चवळी, हरभरा,सोयाबीन वडी,हिरवा वाटाणा,मुगडाळ व इतर साहित्यच वाटप करण्यात आलेले आहे. वाटप करणारी केंद्रीय संस्था तालुक्यात वाटप करण्यात येणारे शालेय पोषण आहाराचे वितरण हे मुंबई येथील केंद्रीय भंडार यांच्या कडून होत आहे. त्यांच्याकडून आणखीन काही संस्थांना हे वितरण कंत्राट दिले गेले आहे काय? केंद्रीय भंडार मधून येणारे अन्नधान्य बाधित आहे की मध्यस्ती करणाऱ्या प्रणालीकडून त्यामध्ये छेडछाड होतेय? तसेच केंद्रीय भंडार कडून पुरवठा होत असल्याने त्यावर कारवाई होणार का? हा प्रश्न उपस्थित होऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होणाऱ्या या खेळा बाबत अन्न व प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. शनिवार असल्याने बघितले पालक सिद्धार्थ गवळी म्हणाले की, रोज शाळा ही दुपारी 4 वाजेपर्यंत असल्याने मुले मिळणारा आहार शाळेतच संपवून येतात. आज शनिवार असल्याने दुपारच्या जेवणावेळी शंका आल्याने भात पहिला असता अळी दिसली. त्यातील कडधान्य व सोयाबीन वडी फोडली असता आतमध्ये आणणे शिजवल्याने मृत झाल्याचे दिसले. रोज मुले शाळेतच खातात या गंभीर प्रकाराबाबत कारवाई होणे गरजेचे आहे. मुलाला सातत्याने पोटदुखी होते याचे कारण आज कळले. धान्य तपासून शिजवण्याचे आदेश देऊ- घोलप वाशी गटशिक्षणाधिकारी सोमनाथ घोलप म्हणाले की, सर्व शाळांना प्राप्त झालेल्या शालेय पोषण धान्य याच्या पॅकिंग मुदत व आजच्या घडलेल्या प्रकाराबाबत सूचना करण्यात येतील. तसेच मुदत जरी संपली नसेल तरी धान्य तपासून शिजवण्याचे आदेश देण्यात येतील.
,

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »