
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्याकरत असल्याचे स्टेटस ठेवून दोन मुलांसह गोदावरी नदीत कार झोकून देणाऱ्या शिक्षक सुनील मोरे यांच्या मृत्यू प्रकरणात एकभयानक सत्य समोर आले. मोरे यांनीपाण्यात उडी घेण्यापूर्वीच १३ वर्षांची मुलगी सारा व ९ वर्षांचा मुलगा सुमीत यांचीशस्त्राने गळा चिरून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.दरम्यान, मोरे यांच्यावर सदोषमनुष्यवधाचागुन्हा नोंदवण्यात आला आहे. भोकर तालुक्यातील बेंबरचे मूळ रहिवासीअसलेले सुनील मोरे हे नांदेडमधीलअंबानगर येथे राहत होते. ते आणि त्यांचीपत्नी हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथीलजिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.यापूर्वी ते हदगाव तालुक्यातील वाणेगाव येथेकार्यरत होते. सन २०२३ ते २०२५ या काळातमोरे यांच्याकडे शालेय पोषण आहाराचाअतिरिक्त कार्यभार होता. यात गैरव्यवहारझाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती.यानंतर तत्कालीन गटशिक्षणाधिकारी किशनफोले, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांतबाचे आणि केंद्रप्रमुख शिवाजी कदम यांनीचौकशी केली. या चौकशीनंतरहीवरिष्ठांकडून सतत मानसिक छळ होतअसल्याचा आरोप मोरे यांच्या नातेवाइकांनीकेला आहे. याच जाचाला कंटाळून सुनीलमोरे यांनी शुक्रवार, १७ जुलै रोजी सकाळी८ वाजेच्या सुमारास मुदखेड मार्गावरीलआमदुरा येथील पुलावरून कार गोदावरीनदीत झोकून दिली होती. गटशिक्षणाधिकाऱ्यासह चार जणांविरुद्धही गुन्हा मोरे यांच्या आत्महत्येला कारणीभूतठरल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी किशनफोले, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांतबाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम, सहकारीशिक्षक विश्वंभर पवळे यांच्याविरुद्ध ग्रामीणपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.