आईने 10 महिन्यांच्या चिमुकलीला बादलीत बुडवून मारले: मृतदेह खांद्यावर घेऊन पोलिसांसमोर हजर, 6 वर्षांच्या मुलीचा विनवणीमुळे वाचला जीव – Solapur News

आईने 10 महिन्यांच्या चिमुकलीला बादलीत बुडवून मारले:  मृतदेह खांद्यावर घेऊन पोलिसांसमोर हजर, 6 वर्षांच्या मुलीचा विनवणीमुळे वाचला जीव – Solapur News



पतीच्या सततच्या त्रासाला आणि कौटुंबिक छळाला कंटाळून एका हतबल झालेल्या माऊलीने स्वतःच्या अवघ्या १० महिन्यांच्या निष्पाप मुलीचा गळा दाबून, तिला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारल्याची धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत घडली.एवढेच नव्हे तर, या मातेने आपल्या ६ वर्षांच्या मोठ्या मुलीचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चिमुरडीने केलेल्या आर्त विनवणीमुळे तिचा जीव थोडक्यात बचावला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपी महिलेचे नाव पूजा योगेश खुर्दामळे (वय २६) असून, मृत चिमुरडीचे नाव शक्ती (वय १० महिने) असे आहे. तर तिची ६ वर्षांची बहीण तेजल सुदैवाने सुरक्षित आहे. मृत मुलीला खांद्यावर घेऊन थेट पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण पोटच्या पोरीचा बळी घेतल्यानंतर आरोपी महिला पूजा हिच्या मनातील राग शांत झाला आणि तिला पश्चात्ताप झाला. तिने मृत पावलेल्या १० महिन्यांच्या शक्तीला आपल्या खांद्यावर घेतले आणि ती तशाच अवस्थेत थेट बार्शी शहर पोलिस ठाण्यात चालत गेली. पोलिस ठाण्यातील अंमलदारांसमोर मृतदेह ठेवत तिने गुन्ह्याची कबुली दिली. “माझ्या पतीच्या रोजच्या जाचाला आणि छळाला मी कंटाळले होते. त्याच त्रासातून मी माझ्या पोटच्या मुलीची हत्या केली आहे, आता मला अटक करा,” असे तिने पोलिसांना सांगितले. एका आईला आपल्या मृत बाळाला खांद्यावर घेऊन पोलिस ठाण्यात आलेले पाहून तिथे उपस्थित असलेले पोलिस अधिकारीही स्तब्ध झाले. आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस… या प्रकरणी पोलिसांनी जेव्हा ६ वर्षांच्या मोठ्या मुलीकडे चौकशी केली, तेव्हा या घटनेतील आणखी एक भयंकर सत्य समोर आले. सुदैवाने बचावलेल्या तेजलने पोलिसांना सांगितले की, “वडील कामावर गेल्यानंतर आईने अचानक रागाच्या भरात लहान बहीण शक्ती हिचा गळा दाबला आणि तिला पाण्याच्या बादलीत बुडवले.” त्यानंतर आईने तेजलकडे मोर्चा वळवला. तिने तेजलचाही गळा दाबण्याचा आणि तिच्या तोंडावर उशी दाबून तिचा श्वास रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृत्यू समोर दिसताच ६ वर्षांची तेजल रडू लागली आणि तिने आईला हात जोडून, “आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस…” अशी आर्त हाक मारली. आपल्या चिमुरडीचे हे शब्द ऐकून आईने तिला सोडून दिले, ज्यामुळे तेजलचा जीव वाचला. आरोपी आईविरोधात गुन्हा दाखल बार्शी शहर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी माता पूजा खुर्दामळे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) (हत्या) आणि १०९ (हत्येचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून, कौटुंबिक वादाची आणि पतीच्या छळाची पार्श्वभूमी तपासून पुढील सखोल तपास सुरू केला आहे. हे ही वाचा… पालघरमध्ये थरारक दरोडा:भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफा दुकान लुटले; सोने पोत्यात भरून चोरटे पसार; VIDEO पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या इराणी नगर परिसरातील ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानावर तीन अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा बंदुकीच्या धाकावर धाडसी दरोडा टाकला. हातात शस्त्र घेऊन आलेल्या या टोळीने दुकानातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने गोळा करून एका पोत्यात भरले आणि घटनास्थळावरून पळ काढला. गजबजलेल्या भागात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे डहाणूसह संपूर्ण परिसरातील सराफा व्यावसायिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »