
कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये सोमवारी सकाळी एक अत्यंत थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकराची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आणि मृतदेह लवकर सडावा
.
प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने घटनास्थळावरून पळ काढला आणि थेट कोलकाता गाठले. मात्र, तिथून पसार झाल्यानंतर तिने घरमालकाला एक व्हॉईस मेसेज पाठवला. फ्लॅटच्या बाथरूममध्ये एक मृतदेह पडलेला आहे आणि तिथे पाण्याचा नळ सुरू ठेवलेला आहे, असे या मेसेजमध्ये म्हटले होते. हा व्हॉईस मेसेज ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.
बाथरूममध्ये पोत्यात आढळला सडलेला मृतदेह
नीलकंठ सोसायटीतील या बंद फ्लॅटमधून गेल्या 2-3 दिवसांपासून उग्र दुर्गंधी येत होती, ज्यामुळे रहिवाशांनाही मोठा संशय आला होता. फ्लॅटला बाहेरून कुलूप असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पोलिसांनी फ्लॅटची पाहणी केली असता, बाथरूममध्ये एक संशयास्पद मोठी गोणी आढळली. ती गोणी उघडून पाहिली असता त्यात एका पुरुषाचा पूर्णपणे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला.
पुरावे मिटवण्यासाठी लढवली क्रूर शक्कल
प्राथमिक तपासानुसार, मृत तरुणाच्या डोक्यावर धारदार हत्याराने गंभीर वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये लपवण्यात आला. घटनास्थळावरील रक्ताचे डाग पाण्यामुळे पूर्णपणे धुवून जावेत आणि मृतदेह पाण्यात भिजून लवकर सडावा, या हेतूने आरोपी महिलेने बाथरूमचा नळ सुरूच ठेवला होता.
मानपाडा पोलिसांचे पथक कोलकात्याला रवाना
मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपी महिलेला अटक करण्यासाठी मानपाडा पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने कोलकात्याला रवाना झाले आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून आणि वादातून झाली, याचा खरा खुलासा आरोपी महिला पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच स्पष्ट होईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.