ससून रुग्णालयातर्फे पुणे जिल्ह्यात चार आरोग्य महाशिबिरे: २२ ते २८ जुलै दरम्यान विविध आजारांची मोफत तपासणी व उपचार – Pune News

ससून रुग्णालयातर्फे पुणे जिल्ह्यात चार आरोग्य महाशिबिरे:  २२ ते २८ जुलै दरम्यान विविध आजारांची मोफत तपासणी व उपचार – Pune News



पुणे जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातर्फे विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २२ ते मंगळवार, २८ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील चार ठिकाणी ही महाशिबिरे होणार आहेत. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आरोग्य अभियानाची सुरुवात बुधवार, २२ जुलै रोजी ससून सर्वोपचार रुग्णालयातून होईल. त्यानंतर, शुक्रवार, २४ जुलै रोजी मंगळवार पेठेतील शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्रात, रविवार, २६ जुलै रोजी हडपसरमधील गाडीतळ येथील सावित्रीबाई फुले शाळेत, तर मंगळवार, २८ जुलै रोजी शिरूर येथील शिरूर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांमध्ये रक्तदानासह स्तन कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, नेत्र तपासणी, हाडांची घनता तपासणी, हाडे व सांधे आणि मुख कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे. गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळेल आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भित केले जाईल. नेत्र तपासणीबरोबरच गरजू रुग्णांसाठी शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, स्थूलता नियंत्रण व बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, हर्निया, छातीचे आजार, मुख कर्करोग, थॅलेसेमिया आणि टाइप-१ मधुमेहाबाबत जनजागृती केली जाईल. पॅलिएटिव्ह केअर, मानवी दूध बँक, कृत्रिम अवयव व पुनर्वसन, हृदयरोग तसेच असंसर्गजन्य आजारांविषयीही नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. डॉ. पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांना या आरोग्य महाशिबिरांचा लाभ घेण्याचे आणि आरोग्यविषयक तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »