NEET आंदोलनाला बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार!: जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या लढ्याला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा – Mumbai News

NEET आंदोलनाला बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार!:  जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या लढ्याला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा – Mumbai News



नीट पेपरफुटी प्रकरणावरून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मोठे आंदोलन पुकारले आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा मिळत असून, आता काँग्रेसनेही यात आक्रमक उडी घेतली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केल्याने हे प्रकरण अधिकच तापले आहे. याच राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लढ्याला बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या दिल्लीला जाण्याची दाट शक्यता आहे. जंतर-मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन ते विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शवणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे काही प्रमुख नेतेही आंदोलनस्थळी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तत्काळ राजीनामा द्यावा- राहुल गांधी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहात तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, यावर आधी सरकारशी बोलावे लागेल, असे उत्तर अध्यक्षांनी दिल्याने राहुल गांधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या संतापजनक घटनेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह लाठीचार्जचे आदेश देणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. जखमी विद्यार्थ्यांची घेतली राहुल गांधींनी भेट दरम्यान, संसद भवनावरील मोर्चात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन भेट घेतली व त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या पाठोपाठ केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनीही याच रुग्णालयात धाव घेत जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांवर योग्य ते उपचार व्हावेत, यासाठी त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांसोबत तातडीची आपत्कालीन बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा “काही मदत हवी आहे का?”, शरद पवारांनी घेतली दिपकेंची भेट:संवाद साधत जाणून घेतली सद्यस्थिती; महाराष्ट्रातील विरोधक विद्यार्थ्यांच्या पाठीशी राजधानी दिल्लीत नीट पेपर फुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन उभे केले आहे. सोमवारी ‘चलो संसद’ आंदोलनाला देशभरातील तरुणांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली होती. आजही दिल्लीत आंदोलन सुरूच असून आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील दिल्लीत हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आज अभिजीत दिपके यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या आंदोलनाला आणखी धार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »