पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ५,२४८ रक्तपिशव्या संकलित: भाजपच्या ४८ केंद्रांवर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन – Pune News

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ५,२४८ रक्तपिशव्या संकलित:  भाजपच्या ४८ केंद्रांवर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन – Pune News



पुणे शहरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील २६ मंडलांमधील ४८ केंद्रांवर एकूण ५,२४८ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. हा उपक्रम पुणे शहरातील सर्वात मोठ्या रक्तदान मोहिमांपैकी एक ठरला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात या रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील रुग्णालये आणि रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाख रक्तपिशव्या संकलित करण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. या राज्यव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत पुणे शहर भाजपने विविध भागांत शिबिरे घेतली. पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस केवळ उत्सवी पद्धतीने साजरा न करता, समाजोपयोगी सेवाकार्यातून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. संकलित केलेले रक्त शहरातील विविध रक्तपेढ्यांना दिले जाईल, ज्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. या शिबिरांमध्ये युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रत्येक केंद्रावर रक्तदात्यांसाठी वैद्यकीय तपासणी, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि आवश्यक सर्व सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त हेल्मेट वाटप-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे सामाजिक बांधिलकी जपत हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनी वाहतूक विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत बारामती नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी तसेच परिवहन विभागातील अपघातमुक्त सेवा बजावणाऱ्या चालकांना मोफत हेल्मेटचे वितरण करण्यात आले. रस्ते सुरक्षा जनजागृती आणि सुरक्षित वाहनचालनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »