युवक काँग्रेसचे मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर आंदोलन: दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राजीनाम्याची मागणी – Pune News

युवक काँग्रेसचे मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर आंदोलन:  दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राजीनाम्याची मागणी – Pune News



महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावेळी युवक काँग्रेस आणि महिला युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान, “हिटलर की बात करेगा, हिटलर की मौत मरेगा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा निषेध, शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाची मागणी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे युवक काँग्रेसने सांगितले. विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे, पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, उमेश पवार, प्रथमेश आबनावे, प्रियांका चौधरी, ओंकार मोरे, महेश म्हेत्रे, भूषण रानभरे, अथर्व सोनार, उमेश खंदारे, आकाश भोपळे, भूषण पाटोदकर, सागर धाडवे, अक्षय बहीरट, सद्दाम शेख, अभिषेक अवचार, करण गिल, निशांत देशमुख, मेघश्याम धर्मावत, कुणाल काळे, स्वप्निल गायकवाड, रोहित पाटोळे, मंथन सपकाळ, प्रसन्न मोरे, दिलीप देशमुख, ऋषी थोरात आणि प्राजक्ता कल्याणी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »