नीट पेपरफुटी निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा: केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक – Pune News

नीट पेपरफुटी निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा:  केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक – Pune News



पुण्यात शुक्रवारी नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हा मोर्चा लाल महाल येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जोरदार पाऊस सुरू असतानाही मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलक विद्यार्थ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक, पोस्टर आणि बॅनर घेतले होते. त्यांनी केंद्र सरकार आणि परीक्षा यंत्रणेच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. जेन झी (Gen Z) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणांनी आपल्या कल्पकतेचा वापर करत मीमच्या माध्यमातून सरकारवर उपरोधिक टीका केली. सोशल मीडियावरील लोकप्रिय संवाद, चित्रपटांमधील प्रसंग आणि इंटरनेटवरील ट्रेंडचा वापर करून तयार करण्यात आलेले फलक आंदोलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. ‘पेपर लीक झाला, आमचे भविष्य नका लीक करू’, ‘अभ्यास आम्ही करायचा, पेपर तुम्ही फोडायचा?’ आणि ‘शिक्षणमंत्री जबाबदारी कधी घेणार?’ अशा आशयाचे संदेश असलेले फलक पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनी आरोप केला की, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यांनी देशपातळीवरील परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलकांनी नीट पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. देशभरातही या प्रकरणावरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी आणि विरोधी पक्षांकडून आंदोलने सुरू आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »