
सरकार सर्व प्रश्नांवर चर्चा करायला तयार आहे. विरोधकांना ही चर्चा होऊ द्यायची नाही, काँग्रेस चर्चेपासून पळ काढत आहे. काँग्रेसला या देशात अराजकता निर्माण करायची आहे. नेपाळ, बांगलादेशमध्ये जशी परिस्थिती तयार झाली त्याच पद्धतीने देशात राजकीय अस्थिरता निर्माण करायची, देशात विद्रोह निर्माण करायचा हा अजेंडा काही समाज कंटकांचा आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, सोनम वांगचुक यांनी काल उपोषण मागे घेतले आहे. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ पोस्ट करत सांगितले आहे की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पेपरफुटी प्रकरणात कायदा तयार करण्याची तयारी सरकारने केली आहे. असे असताना जाणीवपूर्वक या देशामध्ये अराजकता पसरवण्याचे काम सुरू आहे. याला जनता, तरुणाई बळी पडणार नाही. राऊतांना पोटशूळ का? नवनाथ बन म्हणाले की, वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांना पोटशूळ का उठला आहे. ते वांगचुक यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले आहे सरकार चर्चेसाठी तयार आहे पण राऊतांनी वेगळी भूमिका घेतली आहे. राऊतांनी भांडूपच्या गाढव नाक्यावर दोन दिवस उपोषण करत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला पाहिजे. घरात बसून पत्रकार परिषद घेतल्याने काही होत नसते किंवचा एक तास दिल्लीला जाऊन सुद्धा काही होत नाही. तुमच्यात विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याची हिंमत असेल तर त्यांनी किमान दोन दिवस कडकडीत उपोषण केले पाहिजे. ठाकरेंना विद्यार्थी अन् तरुणांशी काही देणंघेणं नाही नवनाथ बन म्हणाले की, मनसे आणि उबाठाच्या वतीने येत्या रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी कुठलाही झेंडा नसेल असे दोन्ही नेत्यांनी सांगितले असले तरी अजेंडा मात्र फिक्स आहे. आदित्य आणि अमित ठाकरे यांचे राजकीय भवितव्य सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. ठाकरेंना विद्यार्थी आणि तरुणांशी काही देणंघेणं नाही. दिल्लीमध्ये काँग्रेस जसे राहुल गांधी यांचे राजकीय भवितव्यासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत राजकारण करत आहेत तसे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचे तर राज ठाकरे अमित ठाकरेंचे राजकारण सेट करण्यासाठी आंदोलनाचा वापर करत आहेत. तुम्ही काहीही आंदोलन केले तरी जनतेवर त्याचा परिणाम होणार नाही. राहुल गांधी परदेशात काय करत होते? नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी हे विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर राजकारण करू पाहत आहेत. ते जंतर मंतरवर जात आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. 20 दिवस विद्यार्थी आंदोलन करत होते त्यावेळी राहुल गांधी कुठे होते ते परदेशात कोणासोबत होते. 99 वेळा राहुल गांधीचा पराभव झाला आता पुन्हा त्यांची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्याकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे.पण जनतेला माहिती आहे की ते देशात कमी आणि बाहेर देशातच जास्त असतात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/