
पुण्यात ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी ९४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. कल्याणीनगर येथील ५५ वर्षीय व्यावसायिकाने याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइलवर संदेश पाठवून त्यांना ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. चांगला परतावा मिळेल असे सांगून, चोरट्यांनी त्यांना विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली आणि आपल्या जाळ्यात ओढले. गेल्या सात ते आठ महिन्यांत, चोरट्यांनी व्यावसायिकाकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ९४ लाख ४० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करून घेतले. मात्र, पैसे गुंतवल्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. घर खरेदी करून देण्याच्या आमिषाने फसवणूक दरम्यान, पुण्यात घर खरेदी करून देण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सचिन पद्माकर पावसकर (रा. तारकेश्वर सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रस्ता) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विश्रांतवाडी येथील ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची आरोपीशी ओळख झाली होती. आरोपीने पैशांची गरज असल्याचे सांगून, पुण्यात चांगले घर खरेदी करून देण्याचे आमिष दाखवले. या बहाण्याने त्याने ज्येष्ठ नागरिकाकडून १२ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने ते परत केले नाहीत आणि ज्येष्ठ नागरिकांनी विचारणा केल्यावर टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एस. वलसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/