गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या 2 बसचा भीषण अपघात: 7 जणांचा मृत्यू, 41 जखमी; मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10, तर PMO कडून 2 लाखांची मदत

गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या 2 बसचा भीषण अपघात:  7 जणांचा मृत्यू, 41 जखमी; मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10, तर PMO कडून 2 लाखांची मदत

  • Marathi News
  • National
  • Maharashtra Bus Accident In Gujarat Updates: Fire Erupts After Collision, 5 Dead

सूरत7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. बारडोलीच्या उवा गावाजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या हृदयद्रावक घटनेत सात प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४१ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने सुरत येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघातील मृतांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारकडून १़० लाख रुपयांची, तर केंद्र सरकारकडून ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’तून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींना केंद्र सरकाकडून ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उवा गावाजवळील महामार्गावर आधीच एक पाण्याचे टँकर पलटी झालेले होते. या टँकरला धडक टाळण्याच्या प्रयत्नात एका एसटी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले. बस वेगात असल्याने तिने दुभाजक ओलांडला आणि विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुसऱ्या महाराष्ट्र एसटी बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एक बस रस्त्यावर दोन-तीन वेळा पलटी झाली आणि काही सेकंदातच तिने पेट घेतला.

बेशुद्ध होईपर्यंत प्रवाशांना बाहेर काढले

जामनेरहून सुरतकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एसटी बसचे जखमी वाहक सोपान नामदेव क्षीरसागर यांनी सांगितले की, समोरील वाहनाने धडक दिल्यानंतर बस रस्त्याखाली गेली. बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी होते. डिझेल बसला आग लागली होती. त्यांनी महिला, मुले आणि इतर प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्याला दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांनी चालकालाही बसमधून बाहेर काढून रस्त्यावर आणले, पण त्यानंतर काय घडले याची त्यांना माहिती नाही.

गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या 2 बसचा भीषण अपघात: 7 जणांचा मृत्यू, 41 जखमी; मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10, तर PMO कडून 2 लाखांची मदत
बस उलटून आग लागल्यामुळे अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

बस उलटून आग लागल्यामुळे अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

सात जणांच्या मृत्यूची जिल्हाधिकाऱ्यांची पुष्टी

सुरतचे जिल्हाधिकारी तेजस पटेल यांनी सात जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मृतदेहांवर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार असून जखमींना योग्य उपचार मिळावेत, ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात धुळे जिल्हा प्रशासनाशीही संपर्क साधण्यात आला आहे. पोलिस, प्रशासन आणि वैद्यकीय पथक समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

जखमींना तीन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी तेजस पटेल यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी ४:३० वाजता झाला. सतरा जखमींवर बार्डोली प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्यापैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. जखमींना तीन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर आणि स्टाफ नर्सेस सर्वांवर उपचार करत आहेत. सात जखमींना सुरत सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

महाराष्ट्राकडे जाणाऱ्या बसला लागली आग

सुरत जिल्हा पोलिस प्रमुख राजेश गढिया यांनी सांगितले की, एक बस सुरतकडे येत होती तर दुसरी महाराष्ट्राकडे जात होती. महाराष्ट्राकडे जाणाऱ्या बसची पाण्याच्या टँकरशी धडक झाली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या महाराष्ट्र एसटी बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर एक बस उलटली आणि तिला आग लागली. घटनास्थळी पोलिस, बचाव पथके आणि अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली.

प्रवाशाचा सांगितला थरारक अनुभव

अपघातात जखमी झालेल्या गणेश शिवाजी कुंभारे यांनी सांगितले की, बस वेगात होती आणि प्रवासी आपापसात बोलत होते. अचानक धडक बसली आणि बस दोन-तीन वेळा पलटी झाली. काही समजण्याआधीच बसला आग लागली. लोक एकमेकांवर पडले होते. जखमी अवस्थेत प्रवासी कसेबसे बाहेर पडले. बाहेर पडताच आग आणखी वाढली. स्थानिक नागरिकांनी मदत केली आणि नंतर पोलिस, रुग्णवाहिका व अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या पत्नीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचा संशय असून पाय आणि कंबरेलाही दुखापत झाली आहे. मुलगी मात्र सुरक्षित आहे.

बसमध्ये ४० हून अधिक प्रवासी

गणेश कुंभारे यांच्या मते, बसमध्ये ४० हून अधिक प्रवासी होते. बस जवळपास भरलेली होती. अपघात इतक्या कमी वेळात घडला की कोणालाही काय झाले हे समजण्याची संधी मिळाली नाही. ते बसच्या मागील बाजूस बसले होते, त्यामुळे नेमकी धडक कशी झाली हे त्यांना दिसले नाही.

गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या 2 बसचा भीषण अपघात: 7 जणांचा मृत्यू, 41 जखमी; मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10, तर PMO कडून 2 लाखांची मदत

बारडोली उवा गाव येथे झालेल्या अपघातातील जखमींची यादी

क्र. नाव वय गाव / पत्ता
1 सरलाबेन संतोष जाधव 54 साक्री, BRL
2 किरीट काळू गावीत 25 घाटा मंदिर फळिया, व्यारा
3 वसंत नयन पाटील 42 धुळे, महाराष्ट्र
4 राजू सुकदेवा शिरसार 60 उत्राण, सुरत
5 रघुवीर जितेंद्र पाटील 7 सुरत, दिल्ली गेट
6 कृष्णा बी. थोरात 69 साक्री, नवापूर
7 दामोदर हिरामणी पाठक 40 मध्य प्रदेश, जि. सिधी
8 गिरधर बाबूराव ढगर 75 धुळे, महाराष्ट्र
9 जितेंद्रभाई पाटील 33 सुरत
10 राजेंद्र भीमसेन महाजन 33 पांडेसरा, सुरत
11 जुबेर जाकीर शेख 32 सोनगढ
12 गणेश शिवाजी कुंभार 36 कतारगाम, सुरत
13 ईशिका गणेश कुंभार 54 कतारगाम, सुरत
14 रामप्रेमी राजभर 45 पांडेसरा, सुरत
15 मोहित जितेंद्र पाटील 54 दिल्ली गेट, सुरत
16 माया गणेश कुंभार 28 कतारगाम, सुरत
17 कविता अजित थोरी 37 धुळे
18 हर्षराज हिम्मत पवार 52 धुळे, महाराष्ट्र
19 मुसरा हमाद पठाण 29 धुळे, महाराष्ट्र
20 सुरेश आत्माराम पाटील 68 उधना, विनायक नगर
21 कमल सुखलाल मिस्त्री 55
22 हमाद इमाम पठाण धुळे, महाराष्ट्र
23 हंसराज गुणवंत पवार 52 धुळे
24 जितेंद्र भरत पाटील 39 दिल्ली गेट, सुरत
25 दगडू सोनू माळी 42 पांडेसरा, सुरत
26 चेतन नाना बाग 39 बाबेन, बारडोली
27 प्राची प्रसाद चोव्हाण
28 मीत प्रसाद चोव्हाण
29 ओमप्रकाश प्रसाद चोव्हाण
30 लीलावती मानसिंग वसावे
31 सोपनदेव नामदेव शिरसागर
32 भरत सीताराम पाटील
33 जगन्नाथ त्र्यंबक तरार
34 सुरेश मोतीराम बिरारी
35 अपुलभाई यासीनभाई शाह
36 सुनंदाबेन वाघ 40 मालेगाव, नाशिक
37 कमलनयन दासजी महाराज
38 रत्ना अशोक सिंधानी 35 साक्री चौगाव, धुळे
39 मीना अशोक सूर्यवंशी 45 साक्री भाडणे
40 मानवी 4 साक्री भाडणे
41 प्रकाश बी. वाघ 39 धुळे, महाराष्ट्र

सुरत सिव्हिल रुग्णालयात नऊ जखमी दाखल

सुरत सिव्हिल रुग्णालयाचे डॉ. लक्ष्मण यांनी सांगितले की, बारडोलीजवळ झालेल्या बस अपघातातील नऊ जखमींपैकी सहा रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही रुग्णांना डोक्याला दुखापत झाली असून काहींना फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात आवश्यक डॉक्टर आणि सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जखमींना रुग्णालयात नेले जात असताना, जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना वैद्यकीय कर्मचारी.

जखमींना रुग्णालयात नेले जात असताना, जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना वैद्यकीय कर्मचारी.

दहा लाखांच्या मदतीची घोषणा

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या अपघात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आर्थिक मदतीची घोषणा केली. ते म्हणाले, “सुरत–धुळे आणि जामनेर -सुरत या एसटी बसेसना गुजरातच्या व्यारा येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. या कठीण प्रसंगी संपूर्ण एसटी परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमी प्रवाशांवर मोफत आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश आपण दिले आहेत. ”

पंतप्रधानांची सहवेदना आणि मदत

या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना केली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. पंतप्रधानांनी या अपघातातील मृताच्या वारसाला ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’ मधून २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, असेही म्हटले आहे.

गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या 2 बसचा भीषण अपघात: 7 जणांचा मृत्यू, 41 जखमी; मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10, तर PMO कडून 2 लाखांची मदत

मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली – वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, गुजरातमधील सूरतजवळ महाराष्ट्रातील दोन बसचा झालेला भीषण अपघात अत्यंत वेदनादायी आणि हृदयद्रावक आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत आतापर्यंत ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्याची आणि जखमींना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार व आर्थिक सहाय्य त्वरित उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.

या दुर्घटनेत बाधित सर्व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या 2 बसचा भीषण अपघात: 7 जणांचा मृत्यू, 41 जखमी; मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10, तर PMO कडून 2 लाखांची मदत

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp