
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयात उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. नामदार श्री. हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मा. राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ आणि नागपूर येथील ‘एम्स’ (AIIMS) चे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सकाळी 11.00 वाजता सोहळ्यास प्रारंभ विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा विद्यापीठ आवारातील ‘शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत’ सकाळी 11.00 वाजता पार पडणार आहे. सर्व प्राधिकरण सदस्य, संलग्नित महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि अभ्यागतांनी या सोहळ्याची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 99 गुणवंतांना 139 सुवर्णपदके आणि डॉ. सरदेशमुख यांना ‘डी.लिट्’ परीक्षेबाबत सविस्तर आकडेवारी देताना परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, या समारंभात विविध अभ्यासक्रमांचे इंटर्नशिप पूर्ण केलेल्या एकूण 12,246 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये पदवी व पदव्युत्तर शाखेचे 8,547 विद्यार्थी, एम.फिल.चे 06 विद्यार्थी आणि 20 विद्यार्थ्यांना पी.एच.डी. पदवी दिली जाईल. सरदेशमुख यांना विद्यापीठाची मानाची ‘डी.लिट्’ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण 99 गुणवंत विद्यार्थ्यांना 139 सुवर्णपदकांनी (Gold Medals) सन्मानित केले जाणार आहे. यासोबतच आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. सदानंद प्रभाकर सरदेशमुख यांना विद्यापीठाची मानाची ‘डी.लिट्’ (D.Litt.) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या भव्य दीक्षांत समारंभास शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि अभ्यागतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/