मुंबईत आंदोलन करणाऱ्या 1500 विद्यार्थ्यांवर FIR: या मुला मुलींचा दोष काय? ही तर शुद्ध हुकूमशाही, संजय राऊतांचा सरकारवर घणाघात – Mumbai News

मुंबईत आंदोलन करणाऱ्या 1500 विद्यार्थ्यांवर FIR:  या मुला मुलींचा दोष काय? ही तर शुद्ध हुकूमशाही, संजय राऊतांचा सरकारवर घणाघात – Mumbai News

नीट परीक्षा घोटाळा, पेपरफुटी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस यंत्रणेकडून होत असलेल्या कठोर कारवाईवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत अत्यंत आक्रमक झाले आहेत. मुंबईत १५०० आंदोलक विद्या

.

संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतात, “मुंबई पोलिसांनी मुंबईत आंदोलन केलेल्या सुमारे १५०० विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल केली आहे. जवळपास यातील २० टक्के आरोपी हे १८ ते २० वयोगटातील आहेत. तर दर दुसऱ्या आरोपीचे वय २५ वयोगटाच्या खाली आहे. दर तिसरा आरोपी महिला आहे. १५०० मुला-मुलींवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी नीट पेपर लिक प्रकरणात शिक्षण व्यवस्था सुधारणार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.”

संजय राऊत म्हणाले, “या तरुण मुला मुलींचा दोष काय ? तर ते नीट परीक्षा घोटाळे मुक्त व्हावी आणि शिक्षणाचा अधिकार मिळावा, पारदर्शक कारभार असावा अशी मागणी करीत होते. आता आणखी एक धक्कादायक काय तर या दिल्लीतील जंतर-मंतरवर मुला-मुलींच्यावर आंदोलन केले म्हणून त्यांचे चेहरे ओळखून त्यांना पासपोर्ट नाकारण्यात येणार आहे. ही शुद्ध डिक्टेटरशिप आहे.”

दिल्लीतील काही भागात इंटरनेट बंद

दरम्यान, सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. अशातच सरकारकडून हे आंदोलन दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. दिल्लीतील काही भागांत इंटरनेट सेवा पूर्णपणे खंडित करण्यात आली आहे, तसेच अनेक मेट्रो सेवा बंद करण्यात आल्या आहेत. काँग्रेससह विरोधकांनी संसदेच्या आत आणि बाहेर जोरदार आवाज उठवत सरकारला धारेवर धरले आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना लाठीमार आणि पोलिसी बळाचा सामना करावा लागत आहे.

हे ही वाचा…

2024 NEET पेपरफुटीच्या मुख्य आरोपीला क्लीनचिट:CBI म्हणाली- संजीव मुखिया यांच्या विरोधात पेपर चोरल्याचे, लीक केल्याचे पुरावे नाहीत; आरोपपत्रात 45 नावे

मुंबईत आंदोलन करणाऱ्या 1500 विद्यार्थ्यांवर FIR: या मुला मुलींचा दोष काय? ही तर शुद्ध हुकूमशाही, संजय राऊतांचा सरकारवर घणाघात - Mumbai News

पेपरफुटीवर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान 2024 NEET-UG च्या मुख्य आरोपीला क्लीनचिट मिळाली आहे. सीबीआयने गुरुवारी माध्यमांना सांगितले की, या प्रकरणात बिहार पोलिसांनी संजीव मुखियाला मुख्य आरोपी बनवले होते, परंतु सीबीआय चौकशीत त्याच्याविरुद्ध प्रश्नपत्रिका चोरल्याचे, त्या लीक केल्याचे पुरावे मिळाले नाहीत. सविस्तर वाचा…

नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार:26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चा, पालकांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

मुंबईत आंदोलन करणाऱ्या 1500 विद्यार्थ्यांवर FIR: या मुला मुलींचा दोष काय? ही तर शुद्ध हुकूमशाही, संजय राऊतांचा सरकारवर घणाघात - Mumbai News

नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »