सिंधू पाण्यावरून वाद: एलओसीवर पाकने 35 ड्रोन युनिट तैनात केले, एआय फेन्सिंग लावले, मुनीरकडून युद्धाचा कट

सिंधू पाण्यावरून वाद:  एलओसीवर पाकने 35 ड्रोन युनिट तैनात केले, एआय फेन्सिंग लावले, मुनीरकडून युद्धाचा कट

  • Marathi News
  • National
  • Indus Water Dispute, LOC: Pakistan Deploys 35 Drone Units, Installs AI Fencing, Munir Plots War

यासिर आलम19 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारताने पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी रोखून त्यांची जमीन कोरडी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंधूचे पाणी रोखल्याने पाकचे कंबरडे मोडले आहे. पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही तोंडघशी पडल्यानंतर एकीकडे पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा अब्बास युद्ध पुकारण्याच्या धमक्या देत आहेत. दुसरीकडे, युद्धाचा मनसुबा बाळगून असलेले आर्मी चीफ असीम मुनीर यांनी आतल्या आत कट रचायला सुरुवात केली आहे. एलओसीवर (नियंत्रण रेषा) पाक लष्कराच्या ८ ब्रिगेडने ३५ अँटी ड्रोन युनिट तैनात केले आहेत. लेझरने सुसज्ज असलेले हे युनिट हवाई हल्ले रोखण्याचे काम करतील.

पाकने एआय फेन्सिंगही केले आहे. याअंतर्गत टार्गेटिंग आणि सर्व्हिलन्स वेगवान करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर ड्रोन ग्रिडही तयार केले आहे. पाकने अफगाणिस्तानला लागून असलेल्या आपल्या सीमेवरून ५ बटालियन या महिन्याच्या सुरुवातीला हलवून एलओसीच्या रावलाकोट, कोटलीमध्ये तैनात केल्या आहेत.

ऑपरेशन सिंदूर… भारताने ११ एअरबेस उद्ध्वस्त केले, पाक दुरुस्ती करतेय

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यात नूर खान, मुरीद, भोलारी, सरगोधा, जेकोबाबाद, सुक्कुर, रहीमयार खान यांसारख्या एअरबेसचे इंधन डेपो आणि रडार सिस्टीम नष्ट झाली होती. पाकचे आर्मी चीफ मुनीर यांनी यांच्या दुरुस्तीसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधीही जारी केला आहे.

पाकिस्तान वायुदल बलुचिस्तानच्या नसीराबाद जिल्ह्यातील नोताल भागात आणि खैबर पख्तूनख्वाच्या मानसेहरामध्ये नवीन एअरबेस बनवण्याच्या योजनेवरही काम करत आहे.

तुर्कस्तानने ड्रोन दिले, पाकसाठी नवी पाणबुडीही, बांगलादेशसोबतही करार

तुर्कस्तानने पाकमध्येच ड्रोन युनिटही उभारले आहे. कराचीजवळील कॉम्बॅट ड्रोन असेंबली प्लांटमधून दरवर्षी ७०० ड्रोन बनवले जातील. पाकने हे ड्रोन बांगलादेशला निर्यात करण्याचा एमओयूही केला आहे. तुर्कस्तान पाकसाठी मिलजेम क्लास पाणबुडीही बनवत आहे. पाकला पाणबुडी वर्षाखेरीस मिळेल.

चीनने मल्टी रोल जे-सीरीजचे ३६ फायटर जेट्स दिले, दक्षिण आशियात एकमेव

ऑपरेशन सिंदूरनंतर चीनने पाकला मल्टी रोल जे-सीरीजच्या ३६ फायटर जेट्सचा पुरवठा केला आहे. पेंटागॉनच्या अहवालानुसार, अमेरिकन एफ-३५ जेटचे चिनी व्हर्जन जे-३५ देखील पाकला मिळणार आहे. सध्या दक्षिण आशियातील कोणत्याही देशाकडे पाचव्या पिढीतील फायटर जेट नाही.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp