
तेलंगणामध्ये गेल्या वर्षीच्या जातीनिहाय सर्वेक्षणाच्या अहवालाने राज्याच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचे गंभीर चित्र समोर आणले आहे. अहवालानुसार राज्यात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमातीचे (एसटी) लोक सामान्य वर्गाच्या तुलनेत ३ पट मागासलेले आहेत. तर ओबीसी वर्ग २.७ पट मागासलेला आहे. एससीचा मागासलेपणा निर्देशांक स्कोअर ९६, एसटीचा ९५, ओबीसीचा ८६ आहे. नियम सांगतो की, स्कोअर जेवढा जास्त असेल, तेवढेच मागासलेपणा अधिक असेल. म्हणजेच तेलंगणात या जाती-वर्गांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती अत्यंत मागासलेली आहे. सामान्य वर्गाचा स्कोअर ३१ आहे. उत्तम स्थिती दर्शवतो. राज्यात २४२ जाती आहेत. यापैकी ६७% लोकसंख्येच्या १३५ जाती अत्यंत मागासलेल्या आहेत. हा अहवाल निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील पॅनेलने सर्वेक्षणानंतर तयार करून राज्य सरकारला सोपवला. हे सर्वेक्षण गेल्या वर्षी राज्यातील ३.५५ कोटी लोकांदरम्यान केले होते. यानुसार राज्याचा सरासरी सीबीआय स्कोअर ८१ आहे. कमाईच नव्हे, सामाजिक ओळखही मागासलेपणाचे प्रतीक तेलंगणात सर्वेक्षण किती लोकांवर केले गेले?
३.५५ कोटी लोक व २४२ जातींवर. जे स्वतंत्र भारताचे पहिले व्यापक घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण आहे.
सीबीआय स्कोअर काय आहे?
हा मागासलेपणा मोजण्याचा निकष आहे (० ते १२६ गुण). यामध्ये शिक्षण, उत्पन्न, घर व सामाजिक भेदभाव यांसारख्या ४२ मानकांच्या आधारे स्कोअर दिला जातो.
सर्वात मागास, सर्वात संपन्न समुदाय कोणता?
सर्वात मागास एससी वर्गाचा दक्कल समुदाय (स्कोअर ११६). खुल्या प्रवर्गाचा कापू समुदाय सर्वात संपन्न (१२). जैन समाजाचा स्कोअर १३, ब्राह्मणांचा २२ आहे.
समान उत्पन्न असूनही तफावत का आहे?
१ लाखापेक्षा कमी कमवणाऱ्या एससी कुटुंबाचा मागासलेपण स्कोअर ४९ आहे, तेवढेच उत्पन्न असलेल्या खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचा स्कोअर १६ आहे. म्हणजे केवळ कमाईवरून मागासलेपण ठरत नाही, यात सामाजिक ओळखही महत्त्वाची.
इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणात काय फरक आहे?
खुल्या प्रवर्गातील ६६.३% तरुण इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत, एसटीत हे प्रमाण केवळ ३६.६% आहे, ज्यामुळे आधुनिक नोकऱ्यांमध्ये त्यांची वाट बिकट होते.
रोजंदारी मजुरीमध्ये कोणत्या जातींचे वर्चस्व?
एससी कार्यबलाचा ४५.७%, एसटीचा ४०.६% हिस्सा रोजंदारी मजूर, तर खुल्या प्रवर्गात हे प्रमाण १०.९% आहे.
खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांची काय स्थिती आहे?
खुल्या प्रवर्गाची लोकसंख्या १२% आहे, मात्र खाजगी नोकऱ्यांमध्ये त्यांचा वाटा १४.८%. एसटीचा वाटा २.८%.
घराच्या स्थितीत काय फरक आढळून आला?
शहरी तेलंगणात ७८.४% खुल्या प्रवर्गातील लोक पक्क्या घरांत किंवा फ्लॅट्समध्ये राहतात. एसटी कुटुंबांत निकृष्ट घरांचे प्रमाण खुल्या प्रवर्गापेक्षा ३ पटीने अधिक आहे.
इन्कम टॅक्स जास्त कोण भरत आहे?
खुल्या प्रवर्गातील २३.५% लोक टॅक्स भरतात, तर एससी वर्गाचे केवळ ६% आणि एसटीचे ५%. तेलंगण
1. राज्याच्या ८८.२% एसटी व ८६.२% एससी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी. खुल्या प्रवर्गात ही संख्या ५६.२%.
2. खुल्या प्रवर्गातील ३३% मुले खाजगी शाळांत जातात, तर एससी/एसटीची १०% पेक्षा कमी.
3. १०७ जातींचा स्कोअर ८१ पेक्षाही खूप जास्त आहे. एकूण लोकसंख्येत हे २९% , म्हणजेच सर्वात मागास लोक.
4. १३.३% पेक्षा जास्त घरांत शौचालय नाही. यात एससीचे १८.८%, एसटीचे ३२.५%, खुल्या प्रवर्गाचे ४.५% आहेत.
5. एकूण २१% घरांमध्ये नळांद्वारे पाणी पोहोचत नाही. यात एससीचे १९.७%, एसटीचे २१%, खुल्या प्रवर्गाचे १२.८%.
6. ५.८% घरांमध्ये वीज नाही. यात एसटीचे ११%, एससीचे ८.३%, ओबीसी ४.७%, खुल्या प्रवर्गाचे २.७% आहेत.
7. खुल्या व अन्य जातींमध्ये कार बाळगणारे ओबीसींपेक्षा ३ पटीने, एससी-एसटीपेक्षा ५ पटीने जास्त आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






