
स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या अडचणीत आता प्रचंड वाढ झाली आहे. मृतदेहाच्या खाजगी भागावर केलेली आक्षेपार्ह टिप्पणी आणि ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’चा जोक प्रणीतच्या चांगलाच अंगलट आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र सायबर सेलने प्रणीत मोरे आणि वैद्यकीय क्षेत्रातीलविद्यार्थिनी सेजल पवार हिला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी या दोघांची सायबर सेलच्या पथकाकडून तब्बल ८ तासांपेक्षा अधिक वेळ कसून चौकशी करण्यात आली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासाला गती देण्यासाठी आणि ठोस डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी प्रणीत मोरे आणि सेजल पवार या दोघांचेही मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. प्रणीतच्या मोबाईलमधील त्याच्या विविध कॉमेडी शोचे व्हिडिओ आणि डेटा जप्त करण्यात आला आहे. तसेच, सेजल पवार हिच्या फोनमधील डेटाची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी तो सुरक्षित ठेवण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या दोघांनाही पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे नवीन समन्स जारी केले जाणार असल्याचे समजते. लोकांच्या भावना दुखावतील असं वाटलं नव्हतं, प्रणीतने मागितली माफी चौकशीदरम्यान प्रणीत मोरेने आपली चूक मान्य करत पोलिसांसमोर वारंवार माफी मागितली. सायबर सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणीतने चौकशीत सांगितले की, “सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा माझ्या एका स्टँड-अप कॉमेडी शोचा भाग असून तो साधारण तीन महिन्यांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आला होता. या विधानामुळे लोकांच्या भावना इतक्या तीव्रतेने दुखावतील आणि या प्रकरणाला इतके गंभीर कायदेशीर वळण लागेल, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.” वापरलेली भाषा अयोग्यच; सेजल पवारलाही पश्चाताप या प्रकरणात प्रणीतसोबत चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली वैद्यकीय विद्यार्थिनी सेजल पवार हिने देखील पोलिसांसमोर आपली बाजू मांडली. त्या शोमध्ये वापरण्यात आलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह आणि चुकीची होती, हे तिने मान्य केले. घडलेल्या संपूर्ण प्रकाराबद्दल तिने तीव्र खेद आणि दुःख व्यक्त केले असून, या सर्व वादामुळे आपल्याला समाजात अत्यंत मान खाली घालावी लागली असून लाज वाटत असल्याचे तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू केला आहे. “दोघांनीही आपली चूक कबूल केली असली, तरी समाजमाध्यमांवर धार्मिक किंवा सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांचे सखोल विश्लेषण केले जाईल आणि त्यानुसारच पुढील कायदेशीर पावले उचलली जातील,” असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील चौकशीत या दोघांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमकं काय आहे प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रणित मोरेच्या शोमधील काही व्हिडिओ क्लिप्स तुफान व्हायरल होत आहेत. यातील एका क्लिपमध्ये कॉमेडियन हिमांशू जांगडा याने एका डेटचा उल्लेख करताना, मुलीवर ३७० रुपयांची बिर्याणी खर्च केली, तर तिच्याकडून ती वसुली (शारीरिक जवळीक) करण्याचा अधिकार पुरुषाला आहे, अशा आशयाची अत्यंत मानहानीकारक आणि अश्लील टिप्पणी केली होती. या वक्तव्यामुळे महिलांच्या संमती आणि प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवल्याचा आरोप होत असून, देशभरातून यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यासोबतच, याच कार्यक्रमाशी संबंधित दुसऱ्या एका क्लिपमध्ये डॉ. सेजल पवार हीने शैक्षणिक उद्देशासाठी वापरल्या जाणाऱ्या मृत पुरुषांविषयी अत्यंत अश्लील आणि अपमानजनक टिप्पणी केल्याचे समोर आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited
