धावत्या रेल्वेच्या खिडकीला लटकून आला युवकाचा मृतदेह: तुमसर रोड स्टेशनवर उघडकीस आला प्रकार, हत्या की आत्महत्या? गूढ कायम – Nagpur News

धावत्या रेल्वेच्या खिडकीला लटकून आला युवकाचा मृतदेह:  तुमसर रोड स्टेशनवर उघडकीस आला प्रकार, हत्या की आत्महत्या? गूढ कायम – Nagpur News



भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड रेल्वे स्थानकावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि विषण्ण करणारी घटना उघडकीस आली आहे. धावत्या टाटानगर-इतवारी पॅसेंजर ट्रेनच्या एका डब्याच्या खिडकीला एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत बाहेर लोंबकळत असल्याचे आढळून आले. ही घटना उघड होताच स्थानकावर आणि प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार चालत्या गाडीत घडलेली आत्महत्या आहे की त्याला मारून खिडकीला लटकवण्यात आले, याबाबत मोठा संशय निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१८ जून) पहाटे ३ वाजताच्या सुमारास टाटानगर-इतवारी पॅसेंजर तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येऊन थांबली. गाडी थांबताच एका डब्याच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने कापडाच्या साहाय्याने गळफास लावलेला एक मृतदेह लटकत असल्याचे काही प्रवाशांच्या नजरेस पडले. हे भयानक दृश्य पाहताच प्रवाशांनी आरडाओरड केली आणि तातडीने रेल्वे स्टेशन प्रशासनाला व पोलिसांना याची माहिती दिली. पायांवर जखमा; ओळख पटवण्यात अडचणी रेल्वेचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाची झडती घेतली असता त्याच्याकडे रेल्वेचे तिकीट किंवा ओळख पटवणारे कोणतेही कागदपत्र आढळून आलेले नाही. अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील या तरुणाच्या अंगावर निळा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट आहे. तपासादरम्यान मृतदेहाच्या दोन्ही पायांवर जबर दुखापतीच्या खूणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे चालत्या गाडीत कुणीतरी त्याची हत्या करून, हा आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी मृतदेह खिडकीला बाहेरून लटकवून दिला का? अशी दाट शंका व्यक्त केली जात आहे. भंडारा ते तुमसर स्थानकादरम्यानच्या रेल्वे प्रवासात हा संपूर्ण प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तूर्तास भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह या खळबळजनक घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF/GRP) गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांची ये-जा आणि गर्दी असताना चालत्या डब्यात एवढा मोठा प्रकार घडतो आणि एकाही प्रवाशाच्या किंवा टीसीच्या हे लक्षात कसे आले नाही? खिडकीबाहेर मृतदेह लोंबकळत असताना प्रवाशांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली पाहिल्या नाहीत का? गाडीमध्ये रेल्वेचे सुरक्षा रक्षक तैनात होते की नव्हते? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता उपस्थित होत आहेत. रेल्वे पोलिस सध्या या गाडीतील प्रवाशांकडे चौकशी करत असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. हे ही वाचा… इचलकरंजीत काळजाचा ठोका चुकवणारा अपघात!:भरधाव कार थेट बसस्थानकातील गर्दीत घुसली; वृद्धेचा जागीच मृत्यू, 5 जखमी इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला. एक भरधाव अनियंत्रित कार थेट बसस्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीत घुसल्याने एका वृद्ध महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अन्य पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुख्य चालकाने पळ काढला, मात्र काही वेळाने दुसऱ्याच एका तरुणाने ‘मीच कार चालवत होतो’ असा बनाव केल्याने उपस्थित जनसमुदाय प्रचंड संतप्त झाला आणि त्यांनी कारची तोडफोड करत तीव्र संताप व्यक्त केला. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp