NEET परीक्षा रद्द करा, शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा!: महाराष्ट्र बंदनंतर प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी, तर दुसरीकडे केंद्राचा नवा कायदा – Mumbai News

NEET परीक्षा रद्द करा, शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा!:  महाराष्ट्र बंदनंतर प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी, तर दुसरीकडे केंद्राचा नवा कायदा – Mumbai News

‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी, गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता थेट ‘नीट’ परीक्षाच

.

प्रकाश आंबेडकरांचे ट्विट

प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून एक अत्यंत सूचक आणि आक्रमक पोस्ट केली आहे. “ABOLISH NEET! DECENTRALISE EDUCATION!” (नीट रद्द करा! शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा!), अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.

आंबेडकरांनी यापूर्वीच NEET परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “पहिली परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पडली आणि फेरपरीक्षेतही अनेक त्रुटी समोर आल्या. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून, सरकारच्या धोरणांमुळे शिक्षण व्यवस्थेवरच अविश्वास निर्माण झाला आहे,” असा दावा करत त्यांनी याविरोधात देशव्यापी जनआंदोलन उभे राहण्याची गरज व्यक्त केली होती.

महाराष्ट्र बंद’ची हाक आणि दडपशाहीचा निषेध

दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘सीजेपी’ (कॉकरोच जनता पार्टी) आणि विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. या दडपशाहीच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (23 जुलै) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. या बंदमध्ये राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी आणि जनतेने सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला संपूर्ण राज्यातून संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.

जंतरमंतरवरील आंदोलनाची सद्य:स्थिती

‘नीट’ मधील गैरव्यवहारामुळे अनेक विद्यार्थी हताश झाले आहेत, तर काहींनी टोकाचे पाऊल उचलून जीव गमावला आहे. याविरोधात जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाचे स्वरूप दिवसेंदिवस व्यापक होत चालले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी या प्रश्नावर तब्बल महिनाभर उपोषण केले. आज त्यांनी आपले उपोषण सोडले असले तरी, ‘सीजेपी’चे संस्थापक आणि इतर आंदोलनकर्ते अद्यापही आक्रमक आहेत. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

केंद्र सरकारचे मोठे पाऊल: पेपरफुटीविरोधात येणार नवा व कठोर कायदा

देशभरात सुरू असलेली उग्र निदर्शने आणि विद्यार्थ्यांच्या आक्रोशाची केंद्र सरकारने अखेर अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची (कॅबिनेट) महत्त्वाची बैठक होणार आहे.

या बैठकीत पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी अस्तित्वात असलेला कायदा अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी एक नवे दुरुस्ती विधेयक आणण्याची सरकारची तयारी सुरू असून, लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…

एखाद्याने आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते!:नीट पेपरफुटीवरून मंत्री चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य, मनसेची टीका- 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू आंबा चोरल्यासारखं वाटतोय?

‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकारण तापले आहे. यातच आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (24 जुलै) एका पत्रकार परिषदेत बोलताना केलेल्या एका अजब वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “एखाद्याने आंबा चोरला, म्हणून त्याची शिक्षा फाशी असू शकत नाही,” असा युक्तिवाद त्यांनी पेपरफुटी प्रकरणावर बोलताना केला. या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »