वारजे घरफोडीचा गुन्हा एका तासात उघड: सराईत चोरट्यास अटक, चोरीचा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त – Pune News

वारजे घरफोडीचा गुन्हा एका तासात उघड:  सराईत चोरट्यास अटक, चोरीचा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त – Pune News



वारजे माळवाडी पोलिसांनी एका घरफोडीचा गुन्हा अवघ्या एका तासात उघडकीस आणत सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी वारजे येथील जनता नगर परिसरातील एका पीजीमध्ये ही घटना घडली. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दोन लॅपटॉप, मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन असा सुमारे २ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोलकेटोटी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात निळे वाडकर चौक, रामनगर परिसरातून मंजुनाथ यल्लप्पा डी. टी. (वय २३) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीकडून चोरीतील एक लॅपटॉप व मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला असून, सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलिस अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोलकेटोटी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे व तपास पथकाने यशस्वीपणे पार पाडली. दरम्यान, वारजे माळवाडी पोलिसांनी पीजी व वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या खोल्या कुलूपबंद ठेवाव्यात, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »