किचनमध्ये झुरळे, माश्या अन् कालबाह्य अन्नधान्य: मुंबईतील 5 नामांकित क्रीडा क्लबला FDA चा दणका, FSSAI परवाने निलंबित – Mumbai News

किचनमध्ये झुरळे, माश्या अन् कालबाह्य अन्नधान्य:  मुंबईतील 5 नामांकित क्रीडा क्लबला FDA चा दणका, FSSAI परवाने निलंबित – Mumbai News

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा फटका आता मुंबईतील प्रतिष्ठित क्रीडा क्लबनाही बसला आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघड झाल्यानंतर एफडीएने मुंबईतील पाच नामांकित क्लबचे FSSAI परव

.

एफडीएच्या कारवाईत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय), आरके जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे पूर्व) आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

तपासणीदरम्यान या क्लबच्या स्वयंपाकगृहांमध्ये झुरळे आणि माशांचा प्रादुर्भाव, अत्यंत अस्वच्छ वातावरण, कालबाह्य अन्नपदार्थांचा वापर आणि अन्नसाठवणुकीतील गंभीर त्रुटी आढळून आल्या. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याने एफडीएने तातडीने परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये वैध FSSAI परवान्याशिवाय तृतीय पक्षामार्फत केटरिंग सेवा सुरू असल्याचेही तपासात उघड झाले. तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये आवश्यक परवान्याशिवाय खाद्य व्यवसाय सुरू असल्याने एफडीएने ‘स्टॉप बिझनेस’ नोटीस बजावली आहे.

चार दिवसांत ८१ ठिकाणांची तपासणी

२४ ते २७ जुलै या कालावधीत एफडीएने राज्यभरात ८१ हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि धाब्यांची तपासणी केली. या मोहिमेत ११ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर १२ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील ही मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

आधी डेअरी, हॉटेल… आता क्लब

तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपद स्वीकारल्यानंतर अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. याआधी पारसी डेअरी फार्म, के. रुस्तम आईस्क्रीम, शालीमार रेस्टॉरंट, नूर मोहम्मदी हॉटेल आणि रहमानिया रेस्टॉरंट यांसारख्या प्रसिद्ध खाद्य आस्थापनांवरही एफडीएने कारवाई करून त्यांचे परवाने निलंबित केले होते. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.

बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनही झाले होते सील

काही दिवसांपूर्वी एफडीएने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवरही धडक कारवाई करत ते सील केले होते. दररोज सात ते आठ हजार कर्मचारी जेथे भोजन करतात, त्या कॅन्टीनमध्ये ताकाच्या ग्लासात मेलेली माशी आणि कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा धागा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर एफडीएच्या पथकाने तपासणी करून गंभीर अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नाची पुष्टी झाल्यानंतर कॅन्टीन बंद केले होते.

मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक मोहिमेमुळे राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि इतर खाद्य व्यवसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा…

सरकारची दोन लाखांची कर्जमाफी कागदावरच?:1.54 लाखांच्या कर्जावर अवघी 94 हजारांची माफी, धाराशिवमध्ये शेतकरी संतप्त

राज्य शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात जमिनीवर या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ सुरू असल्याचा दावा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावात कर्जमाफीच्या यादीतील तफावतीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. 1.54 लाखांच्या कर्जावर अवघी 94 हजारांची माफी देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन लाखांपर्यंतच्या कर्जाची थकबाकी असतानाही प्रत्यक्ष यादीत अत्यंत कमी रक्कम माफ झाल्याचे दिसून येत असल्याने, “ही कर्जमाफी म्हणजे निव्वळ जुमला आहे,” असा घणाघाती आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सविस्तर वाचा…

नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

किचनमध्ये झुरळे, माश्या अन् कालबाह्य अन्नधान्य: मुंबईतील 5 नामांकित क्रीडा क्लबला FDA चा दणका, FSSAI परवाने निलंबित - Mumbai News

‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कॉकरोज जनता पार्टी आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात झालेल्या नीट आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो आंदोलक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »