महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक विभागातर्फे पालखी सोहळा उत्साहात संपन्न: वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले विद्यार्थी – Chhatrapati Sambhajinagar News

महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक विभागातर्फे पालखी सोहळा उत्साहात संपन्न:  वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले विद्यार्थी – Chhatrapati Sambhajinagar News



महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक शाळेतर्फे देवशयनी एकादशीच्या निमित्ताने पारंपारिक पालखी सोहळ्याचे आयोजन दि. 25/07/ 2026 शनिवार रोजी करण्यात आले होते. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती. जणूकाही संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं पाहायला मिळालं. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल वानखेडे, तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक अफसर शेख यांनी पालखीचे पूजन करून पालखी सोहळ्याची सुरुवात केली. मालती वाल्हे यांनी वारीची वैशिष्ट्ये सांगितली. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होत भक्तिमय वातावरण निर्माण केले. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलाच्या नामघोषात कोकणवाडी, क्रांतीनगर, बन्सीलालनगर, रचनाकर कॉलनी परिसरातून पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. विद्यार्थिनींनी“ज्ञानोबा-तुकारामआणि“पांडुरंग हरी “या जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला. प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल वानखेडे यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा, आषाढी वारीचे महत्त्व तसेच संतांच्या विचारांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. पालखी सोहळ्यात सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,विद्यार्थिनीची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मकरंद वाकळे यांनी केले. आभार मनीषा गायकवाड यांनी मानले. हा पालखी सोहळा विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेविषयी आदर निर्माण करणारा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »