
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे आषाढी एकादशी निमित्त शनिवारी ता. २५ पहाटे साडेचार वाजल्यापासून भाविकांची संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुमारे ५० हजारपेक्षा अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तर भाविकांना १५ क्विंटल साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. नर्सी नामदेव येथे मराठवाड्यासह विदर्भातून हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता शनिवारी ता. २५ पहाटे साडेचार वाजल्या पासूनच दर्शनाला सुरवात झाली होती. त्यानंतर सकाळी सात वाजता शिवाजी मुटकुळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, विश्वस्त मनोज आखरे, द्वारकादास सारडा, राहुल नाईक, आंबादास गाडे, रमेश मगर, उपसरपंच ज्ञानेश्वर किर्तनकार यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. त्यानंतर आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी के. के. शिंदे, नारायण खेडेकर, माणिकराव लोडे यांच्यासह नागरीक उपस्थित होते. दरम्यान, नर्सी नामदेव येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पावसामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थान कडून सुमारे १ हजार चौरस फुटाचे वॉटर प्रुफ शामियाने उभारण्यात आले आहेत. तसेच भाविक माणिकराव लोडे यांच्या वतीने १५ क्विंटल साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. या शिवाय दानशुरांकडून ठिकठिकाणी चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली तर संस्थानच्या वतीने दर्शन रांगेत असलेल्या भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुमारे ५० हजार पेक्षा अधिक भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. नर्सी नामदेव परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. नर्सी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे यांच्या पथकाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. हेही वाचा.. …आणिक दर्शन विठोबाचे!: पंढरपुरात पहाटे 3 वा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा; सलग 20 वर्षे वारी करणाऱ्या धाराशिवच्या माने दांपत्याला पूजेचा मान श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस व मानाचे वारकरी दांपत्य यांच्या हस्ते परंपरेनुसार ही पूजा झाली. यंदा मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील गौरगांवच्या बाबासाहेब माने (वय ७०) व प्रभावती माने (वय ६८) या वारकरी दांपत्यास मिळाला. शेतकरी असलेले माने दांपत्य गेल्या २० वर्षांपासून पंढरपूरची वारी करते. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/