
TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांना मोठे यश मिळाले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीचा गुप्त माहिती आणि विविध राज्यांच्या पोलिसांच्या समन्वयातून शोध घेण्यात आला. अटकेनंतर त्याला भिवंडीत आणण्यात येत असून न्यायालयात हजर केले जाणार आहे. छापखान्यातूनच पेपर बाहेर काढल्याचा आरोप तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बिजेंद्र गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैशांचे आणि मालमत्तेचे आमिष दाखवून प्रश्नपत्रिका मिळवल्या. पेपर बुटामध्ये लपवून छापखान्याबाहेर आणण्यात आल्याचा आरोप आहे. अवघ्या ८ हजार रुपयांत मिळवलेल्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्रात तब्बल दीड कोटी रुपयांना विकण्याचा कट रचण्यात आला होता. भिवंडी पोलिसांनी ग्राहक बनून उधळला डाव या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी पोलिसांनी गुप्त कारवाई सुरू केली. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून आरोपींशी संपर्क साधला आणि कोंगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. पेपर विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत यापूर्वी १२ आरोपींना अटक झाली होती. आता मुख्य सूत्रधारालाही अटक झाल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. अनेक राज्यांत गुन्हे, तरीही सतत फरार पोलिसांच्या तपासात बिजेंद्र गुप्ता याच्यावर यापूर्वीही विविध राज्यांतील पेपरफुटी प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. एका हत्या प्रकरणातही त्याला अटक झाली होती. प्रत्येकवेळी जामिनावर सुटल्यानंतर तो ओळख बदलून दुसऱ्या राज्यात कार्यरत होत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. आता या अटकेनंतर देशभरातील पेपरफुटी रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हेही वाचा.. CJP म्हणाली- प्रधानांनी राजीनामा दिला नाही, तर बैठकीला अर्थ नाही:पोलिसांनी जंतरमंतरवरील बॅरिकेडिंग वाढवली; आंदोलकांनी दिला होता कारवाईचा इशारा ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) प्रवक्ते आशुतोष रांका यांनी स्पष्ट केले की, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सरकारशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या CJP आणि सरकार यांच्यातील तिसरी बैठक शनिवारी दुपारी ३:३० वाजता होण्याची शक्यता आहे. या बैठकीत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी अपेक्षा आहे. अवघा रंग एक झाला!: राज्यभरात आषाढी एकादशीचा भक्तीमय उत्साह, पंढरीत भाविकांचा महासागर आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासूनच राज्यभरात आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. आज पहाटे पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी त्यांनी ‘राज्यात चांगला पाऊस पडून पीक बहरू दे आणि महाराष्ट्र समृद्ध होऊ दे,’ अशी प्रार्थना पांडुरंगाचरणी केली. राज्याच्या इतर भागांतही आषाढीचा मोठा उत्साह दिसून येत असून विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी जमली आहे. अनेक शहरे आणि गावांमध्ये पालखी तसेच दिंडीचे आयोजन करून विठूनामाचा जयघोष केला जात असल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/