स्मार्ट मीटरविरोधात नांदगावात भाकपचे आंदोलन: योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर धरणे – Amravati News

स्मार्ट मीटरविरोधात नांदगावात भाकपचे आंदोलन:  योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर धरणे – Amravati News



नांदगाव खंडेश्वर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) स्मार्ट मीटरच्या विरोधात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, वीज ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करावा आणि जनहिताच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाकपने स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आवाहनानुसारच नांदगावात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी स्मार्ट मीटरविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. स्मार्ट मीटरमुळे सामान्य वीज ग्राहकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वीज बिलांच्या संदर्भात ग्राहकांच्या मनात असलेली भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाच्या शेवटी, विविध मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. वीज ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करावे, स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याची प्रक्रिया थांबवावी आणि वीज क्षेत्रातील धोरणे ठरवताना सामान्य ग्राहकांचा विचार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या आंदोलनात भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, पदाधिकारी विनोद तऱ्हेकर, माधव ढोके, राजेश मासुतकर, इस्राइल शहा, हरिदास राजगिरे, मनोहरराव कोराट, सचिन करडे, जयाताई मंडवधरे, आकाश दादरवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »