
‘नीट’ परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या तीव्र दबावापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून,
.
‘नीट’ पेपरफुटीमुळे देशभरातून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे उपोषण आणि दिवसेंदिवस वाढणारा राजकीय दबाव पाहता धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडणे पसंत केले. आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना त्यांनी आंदोलनात ‘अँटी सोशल एलिमेंट्स’ (समाजकंटक) घुसल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.
२२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर मौन, नुकसानभरपाईचे काय?
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला असला, तरी त्यांच्या राजीनामा पत्रातून सरकारची मानसिकता स्पष्ट होते. आंदोलनात समाजकंटक घुसल्याचा दावा करणारे प्रधान, या परीक्षा घोटाळ्यानंतर ज्या २२ निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याबद्दल एक शब्दही बोलले नाहीत किंवा कुठलीही खंत व्यक्त केली नाही. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीचाराचा किंवा अत्याचाराचा उल्लेखही त्यांनी टाळला आहे. तसेच, बाधित विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना काय नुकसानभरपाई मिळणार, याविषयी कुठलीही स्पष्टता सरकारकडून आलेली नाही.”
सरकारवर सर्वोच्च न्यायालयाचाही राग
प्रकाश आंबेडकर यांनी पुढे बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरही भाष्य केले. “सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा सरकार वर राग आहे असं दिसतंय. आधी झुरळ हा शब्द म्हणून आणि नंतर लाठी चार्जचे व्हिडिओ केलेले आम्हाला बघायला वेळ नाही हे दोन वाक्य त्यांचे होते. नुकसानभरपाई आणि परीक्षेतील सुधारणा याबद्दल सरकार बोलायला तयार नाही त्यामुळे माघार का घ्यावी? विद्यार्थ्यी जे निर्णय घेतील त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल,” असा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकरांनी केला.
धर्मेंद्र प्रधान यांची सोशल मीडिया पोस्ट
प्रधान यांनी आपला राजीनामा व्यक्त करणारे एक पत्र प्रसिद्ध केले. दोन पानांच्या, ५७५ शब्दांच्या या पत्रात, प्रधान यांनी इतर गोष्टींबरोबरच, दोन ठिकाणी तरुणांची दिशाभूल केल्याचा उल्लेखही केला आहे. पत्राचा हा भाग खाली ठळकपणे दिला आहे. प्रधान यांनी आपला राजीनामा व्यक्त करणारे एक पत्र प्रसिद्ध केले. दोन पानांच्या, ५७५ शब्दांच्या या पत्रात, प्रधान यांनी इतर गोष्टींबरोबरच, दोन ठिकाणी तरुणांची दिशाभूल केल्याचा उल्लेखही केला आहे. पत्राचा हा भाग खाली ठळकपणे दिला आहे.

हे ही वाचा…
‘जेनझी’ने सरकारच्या झिंज्या उपटल्या:उद्याचा तिरंगा मार्च होणारच, शिवाजी पार्कवर तरुणांचा विजयोत्सव साजरा करू – ठाकरे बंधू

‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि गृहखात्यावर घणाघाती हल्ला चढवला. “हा देशभरातील तरुणाईचा आणि ‘जेनझी’चा ऐतिहासिक विजय असून, त्यांनी मस्तवाल सरकारच्या झिंज्या उपटून त्यांना जमिनीवर आणले आहे,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तर, “पोलिसांच्या अत्याचारावर कारवाई झाली नाही, तर आता तरुणाईचा मोर्चा गृहमंत्री अमित शहांकडे वळल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. सविस्तर वाचा…
युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडले:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- हा एकजुटीचा विजय

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे. आता त्यावर पुढे काय निर्णय होती हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युवा पिढीच्या या आंदोलनाच्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे. युवा पिढीच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/