स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना साडेचार कोटींची वीज सवलत: छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख ग्राहकांना लाभ – Chhatrapati Sambhajinagar News

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना साडेचार कोटींची वीज सवलत:  छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख ग्राहकांना लाभ – Chhatrapati Sambhajinagar News



आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतो, तसेच वापरावर नियंत्रण ठेवणेही शक्य होते. महावितरण घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरावर मोठी सवलत देत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख घरगुती ग्राहकांना आतापर्यंत साडेचार कोटी रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. राज्यात सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांची उपलब्धता वाढली आहे. ही वीज स्वस्त दरात मिळत असल्याने, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणने दिवसाच्या वीजवापरासाठी सवलत लागू केली आहे. टाईम ऑफ डे (टीओडी) प्रणालीनुसार, वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिक ग्राहकांनंतर प्रथमच घरगुती ग्राहकांना स्वस्त वीज दरासाठी टीओडीनुसार आकारणी सुरू करण्यात आली आहे. या सवलतीनुसार, एका विशिष्ट कालावधीत 80 पैसे प्रतियुनिट सवलत देण्यात आली होती. सध्या ही सवलत 85 पैसे प्रतियुनिट असून, पुढील तीन आर्थिक वर्षांत ती वाढत जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात एकूण 2 लाख 75 हजार 34 घरगुती ग्राहकांना मागील 12 महिन्यांच्या वीजबिलात 4 कोटी 59 लाख 9 हजार रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील 75 हजार 681 ग्राहकांना 1 कोटी 87 लाख 57 हजार रुपये, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील 1 लाख 40 हजार 134 ग्राहकांना 1 कोटी 84 लाख 78 हजार रुपये, तर जालना मंडलातील 59 हजार 219 ग्राहकांना 86 लाख 75 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ग्राहकांना दिवसा वीजवापराची सवलत मिळवण्यासाठी टीओडी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अधिक विजेची गरज असणारी उपकरणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत प्राधान्याने वापरून सवलतीचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »