नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण अपघात- VIDEO: उड्डाणपुलावरून ट्रक थेट खाली कोसळला; थरार कॅमेऱ्यात कैद – Maharashtra News

नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण अपघात- VIDEO:  उड्डाणपुलावरून ट्रक थेट खाली कोसळला; थरार कॅमेऱ्यात कैद – Maharashtra News



नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी परिसरात एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला. या घटनेचा संपूर्ण थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुलावरून थेट ट्रक खाली पडल्याने परिसरात काही काळ मोठी खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चालकाचा ताबा सुटला अन् ट्रक खाली कोसळला मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर एमआयडीसी परिसरातील उड्डाणपुलावरून हा ट्रक जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकवरून चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. ताबा सुटलेला हा अवजड ट्रक पुलाच्या कठड्यांना धडकून थेट पुलावरून खाली जमिनीवर जाऊन आदळला. अपघात इतका भीषण होता की ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात एकच गोंधळ, पोलिसांची घटनास्थळी धाव पुलावरून भलामोठा ट्रक अचानक खाली कोसळल्याने मोठा आवाज झाला. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली, तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. या अपघातात ट्रकचालक किती जखमी झाला आहे किंवा इतर कोणती जीवितहानी झाली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस पुढील तपास करत असून परिसरातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. हेही वाचा.. बारामतीतील सुपे येथे भीषण अपघात: दुचाकी घसरून ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू बारामती तालुक्यातील सुपे-चौफुला मार्गावर रविवारी दुपारी एका मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, एकाच घरातील दोन तरुण मुलांचा बळी गेल्याने संपूर्ण बारामती तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी हे दोन्ही भाऊ आपल्या दुचाकीवरून शेंडगेवाडी येथील आपल्या घराकडे निघाले होते. सुपे-चौफुला मार्गावरील अहिल्यादेवी चौकातून वळण घेत असताना अचानक त्यांची दुचाकी स्लिप होऊन घसरली. दुर्दैवाने, त्याच वेळी मोरगावच्या दिशेने जाणारा एक मालवाहतूक ट्रक तेथून जात होता. दुचाकी घसरल्याने दोन्ही भाऊ रस्त्यावर पडले आणि थेट ट्रकच्या मागील चाकाखाली आले. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »