नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’ चित्रपटाचा टीझर रिलीज: 1 जानेवारीला उलगडणार भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक हिरोची गोष्ट

नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’ चित्रपटाचा टीझर रिलीज:  1 जानेवारीला उलगडणार भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक हिरोची गोष्ट


स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा एका भव्य कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्सच्या बहुप्रतिक्षित ‘खाशाबा’ चित्रपटाचा दमदार टीझर आज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, हा महाचित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. टीझरमध्ये काय आहे खास?
चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्शित झालेल्या ‘खाशाबा’च्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता हा टीझर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. क्रीडा इतिहासातील सुवर्णपान उलगडणार नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट एका संघर्षशील कुस्तीपटूची गाथा सांगतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीत ‘कांस्यपदक’ पटकावले होते. भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या या अभिमानास्पद प्रवासावर हा चित्रपट आधारित असून, प्रादेशिक सिनेमातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा क्रीडापट ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्य अभिनेत्याचे नाव गुलदस्त्यात, पण तगडी स्टारकास्ट ‘खाशाबा’ यांच्या मुख्य भूमिकेसाठी नागराज मंजुळे यांनी एका नव्या चेहऱ्याची निवड केली आहे. मात्र, या नवोदित कलाकाराचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. या नव्या चेहऱ्यासोबतच चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकारांची नावे जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यांच्या अत्यंत दमदार भूमिका यात असणार आहेत. १ जानेवारी २०२७ ला सिनेमागृहात धडकणार धुरंधर’, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आणि ‘राजा शिवाजी’ यांसारख्या सलग यशस्वी निर्मितीनंतर जिओ स्टुडिओजने हे आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी २०२७ ला हा चित्रपट सिनेमागृहात धडकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाचा टीझर.. हेही वाचा.. काळजाचा ठोका चुकवणार!:माळीण गावच्या भीषण दुर्घटनेची सत्यकथा आता मोठ्या पडद्यावर; टीझर रिलीज पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ‘माळीण’ गावावर कोसळलेल्या निसर्गाच्या भीषण कोपाची सत्यकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याच्या त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाचा थरारक टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या २४ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp