राज्यसभा निवडणूक: मप्र काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द, प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्यामुळे कारवाई

राज्यसभा निवडणूक:  मप्र काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द, प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्यामुळे कारवाई

  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh Congress Rajya Sabha Candidate Natarajan’s Nomination Paper Cancelled, Action Taken For Concealing Information In Affidavit

भोपाळ, नवी दिल्ली14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मप्र राज्यसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी रद्द केला. नटराजन यांनी तेलंगणामध्ये प्रलंबित प्रकरणाची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच उमेदवारी अर्जाशी संबंधित कागदपत्रांमध्येही त्रुटी आहेत.

दुसरीकडे, दिल्लीत काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी पोहोचले, परंतु त्यांना आत जाण्याची परवानगी दिली गेली नाही. यानंतर वरिष्ठ नेते केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल, सचिन पायलट व दीपा दासमुन्शी यांनी निदर्शने केली.

अर्ज रद्द, आता पुढे काय?

१८ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ११ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. राज्यातील ३ जागांसाठी भाजपचे तीनच उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp