
शहरातील भोकरदन रोडवरील एकतापेट्रोल पंपाच्या पाठीमागीलनगरपरिषदेच्या पाणीटाकीजवळबुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारासएका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचागळा शस्त्राने चिरून खून केल्याचीघटना उघडकीस आली आहे.मृताचीओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह कुजलेल्या अवस्थेतआढळून आल्याने, खुनानंतर पुरावेनष्ट करण्याच्या उद्देशाने तो या निर्जनस्थळी फेकून दिल्याचा संशय व्यक्तहोत आहे. डायल ११२ वर मिळालेल्यामाहितीवरून पोलिस कर्मचारीसलीमपाशा चांदपाशा मोमीन यांनीतातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथेमृताच्या डाव्या डोळ्याजवळ गंभीरदुखापत असून गळा चिरलेल्यास्थितीत मृतदेह आढळला. पोलिसांनीदिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड शहरपोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्धगुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसनिरीक्षक शामसुंदर कौठाळे,सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोदभिंगारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसनिरीक्षक विजयसिंग राजपूत,फौजदार धम्मदीप काकडे व अनंतजोशी यांनी फॉरेन्सिक पथकासहघटनास्थळी भेट दिली. पथकाने तेथूनरक्त आणि मातीचे नमुने जप्त केले.मृतदेहाचा पंचनामा करून तोशवविच्छेदनासाठी पाठवला असूनफिंगरप्रिंट तज्ज्ञांकडूनही गुन्ह्याचातपास सुरू आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/