digital products downloads

₹500 मध्ये नोकरी केली, टोमणे सहन केले, आता फॅशन आयकन: मेट गाला ते मायकल जॅक्सनपर्यंत; मनीष मल्होत्राच्या संघर्षाची कहाणी

₹500 मध्ये नोकरी केली, टोमणे सहन केले, आता फॅशन आयकन:  मेट गाला ते मायकल जॅक्सनपर्यंत; मनीष मल्होत्राच्या संघर्षाची कहाणी


फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​कोणत्याही परिचयाचे मोहताज नाहीत. पण या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांवर मात करावी लागली आहे. सध्या मनीष ‘मेट गाला’मध्ये प्रदर्शित केलेल्या त्यांच्या विशेष पोशाखांमुळे चर्चेत आहेत. चला, त्यांच्या संघर्षातून यशापर्यंतच्या प्रवासाची कहाणी जाणून घेऊया…. मुंबईतील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात 5 डिसेंबर 1966 रोजी जन्मलेले मनीष त्यांच्या शालेय जीवनात आईसोबत केवळ साड्या खरेदी करायला जात नव्हते, तर साड्यांबद्दल त्यांना फॅशन टिप्सही देऊ लागले होते. येथूनच फॅशन आणि कॉस्ट्यूम डिझाइनबद्दल त्यांची आवड वाढू लागली. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांची खूप आवड होती. ते जवळजवळ प्रत्येक चित्रपट पाहायला जात असत, पण कलाकारांच्या अभिनयापेक्षा मनीषचे लक्ष त्यांच्या पोशाखांवर असायचे. कलाकारांचे पोशाख पाहून ते फॅशनचे बारकावे समजू लागले. संघर्ष – डिझायनिंगची पदवी घेऊ शकले नाहीत, सेटवर लोक त्यांना कपडे शिवणारा म्हणत असत 1980 च्या दशकात फॅशन डिझायनिंगला पुरुषांचा व्यवसाय मानले जात नव्हते. लोक त्यांची चेष्टा करत होते. मनीष कधीही डिझायनिंगचे औपचारिक शिक्षण घेऊ शकले नाहीत, कारण त्यावेळी देशात पुरुषांसाठी फॅशन डिझायनिंगचे अभ्यासक्रम नव्हते. आणि परदेशात जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मुंबईतील “इक्विनॉक्स’ बुटीकमध्ये केवळ 500 रुपये प्रति महिना पगाराची नोकरी केली. येथे त्यांना ग्राहकांना कपडे दाखवण्याचे आणि त्यांची घडी घालण्याचे काम मिळाले. मोकळ्या वेळेत मनीष लपून डिझाइन स्केच बनवत असत. बॉलिवूडच्या सुरुवातीच्या वर्षांत निर्माते त्यांचे डिझाइन खूप ग्लॅमरस असल्याचे सांगून नाकारत असत. सेटवर त्यांना सांगितले जात असे की, तुम्ही कपडे शिवणारे आहात, ते द्या आणि निघा. सुरुवात – “रंगीला’मुळे बॉलिवूडमधील मोठे व्यक्तिमत्व बनले, जॅक्सनचे जॅकेट डिझाइन केले मल्होत्रा यांनी 1990 मध्ये “स्वर्ग” चित्रपटात जुही चावलासाठी वेशभूषा डिझाइन करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मनीष सांगतात की, “गुमराह” चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदा यश जोहर यांनी 10 हजार रुपये दिले. 1995 मध्ये “रंगीला” चित्रपटातील उर्मिला मातोंडकरच्या पोशाख डिझाइनने त्यांना रातोरात बॉलिवूडमधील एक मोठे नाव बनवले. 1996 मध्ये मायकल जॅक्सन भारतात आले होते, तेव्हा मनीष यांनी त्यांचे जॅकेट डिझाइन केले होते. यश – स्वतःच्या नावालाच लक्झरी ब्रँड बनवले, कामगारांच्या कल्याणाशीही जोडले गेले मनीष यांनी 2005 मध्ये स्वतःच्या नावाने डिझायनर कपड्यांचा लक्झरी ब्रँड सुरू केला. त्यांनी स्किन केअर आणि ज्वेलरीमध्येही आपले कलेक्शन लॉन्च केले आहे. आयफा, फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ते चिकनकारीच्या महिला कामगारांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेशीही जोडले गेले आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 2500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp