जामनेरातील अपर तहसील कार्यालय शेंदुर्णीतच व्हावे: सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी निर्धार; नगराध्यक्ष अग्रवाल यांच्याकडून पाठपुराव्याची ग्वाही‎ – Jalgaon News

जामनेरातील अपर तहसील कार्यालय शेंदुर्णीतच व्हावे:  सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी निर्धार; नगराध्यक्ष अग्रवाल यांच्याकडून पाठपुराव्याची ग्वाही‎ – Jalgaon News



जामनेर तालुक्यासाठी मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय शेंदुर्णी येथेच व्हावे, या मागणीसाठी शेंदुर्णी येथील नागरिकांनी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. यासंदर्भात आठवड्यातून दोनदा प्रथम नगरपंचायत कार्यालय व त्यानंतर माहेश्वरी मंगल कार्यालयात सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेंदुर्णी येथेच कार्यालय सुरू करण्याची मागणी लावून धरली. जामनेर खालोखाल शेंदुर्णी हे सर्वाधिक महसूल देणारे नगरपंचायत शहर आहे. येथे आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रहिवास व्यवस्था उपलब्ध आहे. गेल्या वीस वर्षांपासून येथील लोकप्रतिनिधींनी या कार्यालयाची मागणी वरिष्ठांकडे लावून धरली होती. शेंदुर्णी ही एक मोठी बाजारपेठ असून बी-बियाणे, कापड, किराणा व विविध व्यवसायांसाठी तालुक्यातील नागरिक येथे येतात. तसेच प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरीत त्रिविक्रमाच्या दर्शनासाठी भाविक व शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी येत असतात. त्यामुळे हे कार्यालय येथे झाल्यास नागरिकांना एकाच फेरीत शासकीय कामे उरकता येतील, अशी भावना व्यक्त होत आहे. बैठकीत बोलताना नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी, मंजूर झालेले कार्यालय शेंदुर्णी येथेच आणण्यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागरमल जैन, भाजप नेते पंडितराव जोहरे, मनसेचे जिल्हा सचिव डॉ. विजयानंद कुलकर्णी, उपनगराध्यक्ष शरद बारी व संतोष चौधरी आदींनी मनोगत व्यक्त करत या लढ्यासाठी एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार केला. निवडणुकीचे आश्वासन पूर्ण करण्याची हीच संधी ^”भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची हीच योग्य संधी आहे. मागील अनुभव पाहता यावेळेस शेंदुर्णीकरांच्या पदरी निराशा पडू नये. आमचा चांगल्या गोष्टींना नेहमीच पाठिंबा आहे. आणि हे कार्यालय शेंदुर्णीत व्हावे यासाठी आमच्या पक्षाचे पूर्ण सहकार्य व पाठिंबा राहील. – संजय सूर्यवंशी, शिवसेना शहर प्रमुख, शेंदुर्णी

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp