खरीप हंगामात 35 हजार 560 हेक्टर जमिनीवर सोयाबीनचा पेरा: 84 हजार 768 पैकी 83 हजार895 हेक्टरवर नियोजन‎ – Chhatrapati Sambhajinagar News

खरीप हंगामात 35 हजार 560 हेक्टर जमिनीवर सोयाबीनचा पेरा:  84 हजार 768 पैकी 83 हजार895 हेक्टरवर नियोजन‎ – Chhatrapati Sambhajinagar News



यंदाच्या खरीप हंगाम २०२६-२७ साठी येथील कृषी विभागातर्फे तालुक्यातील वही ती खालील ८४ हजार ७८७ हेक्टर जमिनीपैकी ८३,८९५ हेक्टर जमिनीवर विविध खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले होते त्यापैकी ६३ हजार ८४८ हेक्टर जमिनीवर सहा जुलै पर्यंत प्रत्यक्षात पेरणी झाली आहे पेरणीची टक्केवारी ही ७६ टक्के आहे.३५ हजार ५६० हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी झाली असल्याने यंदाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पादन घेण्यास पसंती दिली असल्याचे पहावयास मिळत आहे. सोयाबीन खालोखाल कापसाचीही पेरणी झाली आहे यंदा रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर संकटाचे ढग उभे ठाकले होते. पण, मृग नक्षत्राच्या अखेरीस व आद्रा नक्षत्राच्या आरंभात तालुक्यातील काही गावात कुठे अधिक तर कुठे कमी पाऊस बरसला. ज्या ठिकाणी चांगला पाऊस बरसला त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी यापुढे अधिक पाऊस बसेल या आशेवर खरेदी केलेले मोला महागाईच्या बियाणे बियाण्यांची पेरणी केली. तर काही शेतकऱ्यांनी गत आठवड्यात पेरण्या केल्या आहेत. त्यावरही पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या साधल्या आहेत. परंतु गत दोन-तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली असली तरी पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. अशा तक्रारी अजून पर्यंत नाहीत जुलै च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शंभर टक्के पेरण्या आटोपतील असा अंदाज येथील कृषी विभागाने वर्तवला आहे. मृग नक्षत्रात पेरण्या झाल्या तर उत्पादन चांगले येते. असे जुने जाणकार शेतकरी सांगतात यंदा पेरण्या दरवर्षीपेक्षा १५ दिवस उशिराने झाल्यामुळे त्याचा फटका उत्पादनावर होणार असल्याचे बोलले जाते. यंदा वरूण राजाचा अजब गजब खेळ अनेक गावातील शेतकऱ्यांना पहावयास मिळत आहे. एखाद्या गावात जोरदार पाऊस असतो तर पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील गावात पावसाचा एकही थेंब नसतो. असाच प्रकार पण खामगाव शहरात पहावयास मिळत आहे. पाऊस पडल्यानंतर हवेत काही तास गारवा राहतो काही वेळानंतर ऊन पडल्यानंतर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना उकाडा अधिक जाणवत आहे. याचा परिणाम पिकांबरोबरच माणसाच्या शरीरावर होत आहे. शेतकऱ्यांची ट्रॅक्टर द्वारे पेरणीला पसंती बैलजोडींची संख्या कमी झाल्याने आणि बैल जोडीने पेरणी करायची झाल्यास पैसे अधिक मोजावे लागत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी पसंती देत आहेत. कारण ट्रॅक्टरने पेरणी केल्यास पेरणी लवकर होते आणि पैसाही कमी लागतो.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp