सोसायटीत व्यावसायिकाची साडेसहा लाखांची रोकड हिसकावली: रखवालदाराकडे पिशवी देताना चोरट्यांनी केली चोरी – Pune News

सोसायटीत व्यावसायिकाची साडेसहा लाखांची रोकड हिसकावली:  रखवालदाराकडे पिशवी देताना चोरट्यांनी केली चोरी – Pune News



पुण्यात गुलटेकडी येथील एका सोसायटीच्या आवारात व्यावसायिकाची साडेसहा लाखांची रोकड आणि दोन मोबाईल असलेली पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना ९ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ६९ वर्षीय व्यावसायिक हे गुलटेकडीतील हर्ष सोसायटीत राहतात. ९ जुलै रोजी रात्री काम आटोपून ते सोसायटीच्या आवारात आले. त्यांनी आपली पिशवी रखवालदाराकडे ठेवण्यासाठी दिली. रखवालदार त्यांना सोडण्यासाठी जात असतानाच, त्यांच्या मागावर असलेल्या चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी व्यावसायिकाच्या हातातून साडेसहा लाख रुपये रोख आणि दोन मोबाईल असलेली पिशवी हिसकावून घेतली. चोरट्यांचा एक साथीदार सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दुचाकीवर थांबला होता. रखवालदार आणि व्यावसायिकाने आरडाओरडा करताच, चोरटे दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील शेळके या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, शहरात मोबाईल चोरीच्या आणखी दोन घटना समोर आल्या आहेत. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात एका मोटारचालक महिलेचा मोबाईल संच चोरून नेण्यात आला. ९ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. सिग्नलला गाडी थांबलेली असताना आणि काच उघडी असताना चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे स्टेशन परिसरातही एका प्रवासी तरुणाचा मोबाईल चोरीला गेला. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. मुंबईहून आलेल्या या तरुणाचे लक्ष नसताना, टॅक्सी चालकाशी बोलत असताना त्याच्या खिशातून ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरण्यात आला. या घटनेची नोंद बंडगार्डन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोरे अधिक तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp