
येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालय व मतदार साक्षरता क्लब (ईएलसी) यांच्या वतीने बुधवारी (दि. १५) चांदवड शहरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदार साक्षरता आणि मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत (एसआयआर) व्यापक जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण व निवडणूक नायब तहसीलदार जे. एस. केदारे यांच्या वतीने देण्यात आली. या रॅलीत विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि मतदार साक्षरता क्लबचे सदस्य सहभागी झाले होते. हातात जनजागृतीचे फलक आणि घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे आणि मतदार यादीत नाव नोंदवणे किती गरजेचे आहे, याचे महत्त्व पटवून दिले. तसेच बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना सहकार्य करून आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. नेमिनाथ विद्यालय, चिंचबन, गाडगेबाबा चौक, सोमवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम रोड, नगरपरिषद कार्यालय मार्गे रॅलीचा नेमिनाथ विद्यालयात समारोप करण्यात आला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
