
भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर महानगरच्या वतीने आज शहागंज येथील गांधी भवन परिसरात काँग्रेस पक्षाने पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. या वेळी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. या निषेध आंदोलनात कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केणेकर, भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे, महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, विविध मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करत अशा प्रकारची आंदोलने लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी असल्याचे सांगितले. तसेच केंद्र सरकारच्या जनहिताच्या निर्णयांना पाठिंबा देत भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. दरम्यान, राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर लोकसभेचे विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरातील खासदार तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी बाळाचा वापर करत राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी यांना देखील अटक केली होती. यावेळी राहुल गांधी यांना थेट उचलून गाडीत बसवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता भाजपनेही आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा NEET पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक:मुंबईसह नागपूर-पुणे आणि छत्रपती संभाजीनगरात आंदोलन; हर्षवर्धन सपकाळांसह अनेक नेते ताब्यात दिल्लीत राहुल गांधी यांच्यावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेसने बुधवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. गांधी भवन परिसरात झालेल्या या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नसीम खान यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/