
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील विविध महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. नागपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती, मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन या सर्वच मुद्द्यांवर त्य
.
आंदोलक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
राज्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. ते म्हणाले की, राज्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांदरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर पोलिसांत केसेस दाखल झाल्या आहेत, त्या सर्व केसेस मागे घेण्याचे आदेश मी पोलिस आणि गृह विभागाला दिले आहेत. तसेच, या सर्व आंदोलनांदरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय संयमाची भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपूरमधील पूरस्थिती आणि रेस्क्यू ऑपरेशन
नागपूर शहरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसावर फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. “नागपुरात एका महिन्याचा पाऊस अवघ्या एकाच दिवसात पडला आहे. यामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले असून, ३ शाळांमध्ये तर विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवावे लागले, अशी माहिती त्यांनी दिली. शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळेही काही ठिकाणी पाणी साचल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच, आजही संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जरांगे पाटलांच्या शंका दूर करू
मराठा आरक्षणासाठी कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “महायुती सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी जे ऐतिहासिक निर्णय घेतले, ते यापूर्वी कोणत्याही सरकारने घेतले नव्हते. असे असले तरी, जर मनोज जरांगे पाटील यांच्या मनात अजूनही काही शंका किंवा सरकारबद्दल रोष असेल, तर आम्ही त्यावर चर्चेतून नक्कीच योग्य मार्ग काढू.
राहुल गांधींवर घणाघाती टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट शब्दांत हल्लाबोल केला. “राहुल गांधी यांच्या भाषणात कधीही काहीही नवीन नसते. देशात केवळ अराजकता माजवणे हा एकच अजेंडा घेऊन राहुल गांधी सध्या काम करत आहेत,” अशी टीका फडणवीस यांनी केली.
हेही वाचा..
अंतरवालीतून पुन्हा एल्गार: मनोज जरांगेंचा 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा, म्हणाले- 58 लाख प्रमाणपत्रे घेणारच

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटी येथून त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ५८ लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलनाची मोठी घोषणा केली आहे. समाजाला वेड्यात काढले जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/