अजिंठा घाटामध्ये आयशर-कंटेनरचा अपघात; सुदैवाने दोन्ही चालक वाचले: आयशरमधील लाकडी गट्टू रस्त्यावर विखुरले, वळण रस्त्यावरील घटना‎ – Chhatrapati Sambhajinagar News

अजिंठा घाटामध्ये आयशर-कंटेनरचा अपघात; सुदैवाने दोन्ही चालक वाचले:  आयशरमधील लाकडी गट्टू रस्त्यावर विखुरले, वळण रस्त्यावरील घटना‎ – Chhatrapati Sambhajinagar News



अजिंठा घाटातील अवघड वळणावर आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, धडकेनंतर आयशर ट्रक थेट रस्त्यावरच पलटी झाला. रेडिमेड कपड्यांचे गठ्ठे घेऊन घाट उतरणारा कंटेनर (आरजे २३ जीसी ७७१४) आणि लाकडी गट्टू घेऊन घाट चढणारा आयशर (एमएच १९ सीएक्स ०७७३) यांची वळणावर समोरासमोर धडक झाली. या धडकेमुळे आयशरमधील लाकडी गट्टू रस्त्यावर सर्वत्र विखुरले गेले. सुदैवाने, या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक किरकोळ जखमी झाले असून मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी आकाश गवळे व ठाकरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्यावरील अडथळे दूर करत वाहतूक एकेरी मार्गाने सुळीत सुरू केली, ज्यामुळे घाटात होणारी मोठी वाहतूक कोंडी टळली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »