जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह: मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा सांगवीतील भोंदूबाबा यौवन गोहाडला अटक – Nashik News

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:  मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा सांगवीतील भोंदूबाबा यौवन गोहाडला अटक – Nashik News



धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा यौवन भानुदास गोहाड (रा. दारणा सांगवी) याला अटक केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील पीडित महिला चहाचे दुकान चालवते. व्यवसायात अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने ओळखीच्या व्यक्तींनी तिला भोंदूबाबा यौवन गोहाडकडे जाण्याचा सल्ला दिला. गोहाडने मंतरलेले तांदू व जडीबुटीच्या माध्यमातून व्यवसायात भरभराट होईल, असे सांगून तिच्याकडून तीन हजार रुपये उकळले. त्यानंतर भोंदूने पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. संशयिताने पहिले लग्न झालेले असतानाही पीडितेशी जबरदस्तीने विवाह केला. लग्नानंतर तीन वर्षे तिचा छळ सुरू होता. काही दिवसांपूर्वी भोंदूने पीडित महिला व त्यांच्या एक वर्षाच्या मुलाचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यातून सुटका करून घेत पीडितेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. पोलिसांकडे करा तक्रार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पीडितेला ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नेत तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या निर्देशानुसार सायखेडा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारची फसवणूक किंवा अत्याचार सहन केलेल्या नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, प्रल्हाद मिस्त्री व कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp