digital products downloads

नाशिक आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरण: वेषांतर करून रॅकेटचा पर्दाफाश, आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय; पोलिसांचे खळबळजनक खुलासे – Nashik News

नाशिक आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरण:  वेषांतर करून रॅकेटचा पर्दाफाश, आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय; पोलिसांचे खळबळजनक खुलासे – Nashik News



नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणी आणि महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकरण नुकतेच समोर आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क ‘वेषांतर’ करून कंपनीत प्रवेश मिळवला आणि पुराव्यांसह या रॅकेटचा पर्दाफाश केला. तसेच या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का याचा तपास केला जात असल्याची माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (१५ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत नाशिक शहर पोलिसांत एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे, जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कलमांचा समावेश आहे. या प्रकरणात ४ महिलांनी लैंगिक शोषणाची, तर इतर ३ महिलांनी धर्मांतर आणि अत्याचाराची तक्रार दिली आहे. पीडित महिलांच्या तक्रारीवरून एकूण ८ आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये ६ पुरुष आरोपी एकमेकांचे नातेवाईक किंवा संबंधित आहेत. याशिवाय आरोपी निदा खानवर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी, तर अश्विनी चैनानी हिच्यावर पीडित महिलांना मदत न करता आरोपींना पाठीशी घातले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे उघडीस आला प्रकार : पोलिसांचे धाडसी ‘ऑपरेशन’ पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचे होते. पहिली पीडित महिला प्रचंड दहशतीखाली होती. तिचे समुपदेशन करून तिला धीर दिल्यानंतर तिने तक्रार नोंदवली. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी नाशिकच्या महिला पोलिसांनी वेषांतर केले आणि कंपनीत कामगार म्हणून जाऊन गोपनीय माहिती गोळा केली. त्यानंतर कारवाई केली. रिसॉर्टमधील पुरावे जप्त पहिल्या तक्रारदार पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने तिला एका रिसॉर्टवर नेले होते. पोलिसांनी या माहितीची शहानिशा करून संबंधित रिसॉर्टमधून महत्त्वपूर्ण तांत्रिक आणि भौतिक पुरावे जप्त केले आहेत. या पुराव्यांच्या आधारे आरोपींवरील गुन्हा सिद्ध करणे सोपे होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि NIA, ATS चा सहभाग हे केवळ स्थानिक स्तरावरील रॅकेट नसून यात काही आंतरराष्ट्रीय किंवा कट्टरपंथी संघटनांचा हात आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. “आरोपींना बाहेरून कोणी आर्थिक रसद पुरवत होते का किंवा कोणत्या मोठ्या संघटनेचे हे कटकारस्थान आहे का, हे तपासले जात आहे. यासाठी आम्ही SIT, ATS आणि NIA यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला आहे,” असे संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp