पंतप्रधानांनी 75 अमृत रेल्वे स्थानकांचे केले लोकार्पण: बारामती, नांदुरा स्थानकांचा समावेश; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित – Pune News

पंतप्रधानांनी 75 अमृत रेल्वे स्थानकांचे केले लोकार्पण:  बारामती, नांदुरा स्थानकांचा समावेश; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित – Pune News



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. यावेळी बारामती रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मनोगत व्यक्त केले. बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून, बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पुणे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, रेल्वे विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा आधुनिकतेकडे वेगाने प्रवास सुरू आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित आणि प्रवासीस्नेही सेवा यामुळे भारतीय रेल्वे नव्या भारताच्या विकासाचे प्रतीक बनली आहे. अमृत भारत स्टेशन योजना आणि वंदे भारतसारखे उपक्रम या परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आहेत. देशात आतापर्यंत २६१ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून, आज आणखी ७५ स्थानके राष्ट्राला समर्पित करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना मोठी गती मिळाली असून, बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास त्याचाच एक महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योग, शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रातील बारामतीची ओळख अधिक बळकट करण्यासाठी हे आधुनिक स्थानक उपयुक्त ठरेल. या पुनर्विकसित स्थानकामुळे औद्योगिक क्षेत्राला वाहतूक सुविधा, कृषी उत्पादनांना बाजारपेठ, तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार आहे. सुमारे २६.५ कोटी रुपये खर्चून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला असून, त्यासाठी राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. स्थानकाच्या इमारतीमध्ये आधुनिक सुविधांसह स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब दिसेल अशी वास्तुरचना करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, आधुनिक प्रतीक्षागृह, स्वच्छ प्रसाधनगृहे, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रणाली तसेच स्थानिक हस्तकला आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष दालनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ‘व्होकल फॉर लोकल’ संकल्पनेलाही चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp