पुणे शहरात जड वाहनांना तात्पुरती बंदी: 15 ते 24 जून दरम्यान वाहतुकीत मोठे बदल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – Pune News

पुणे शहरात जड वाहनांना तात्पुरती बंदी:  15 ते 24 जून दरम्यान वाहतुकीत मोठे बदल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – Pune News



पुणे शहरात वाढती वाहतूक कोंडी आणि जीवघेण्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५ ते २४ जून २०२६ या कालावधीत जड, अवजड आणि बहु-अ‍ॅक्सल वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत असला तरी, रस्ते आणि पर्यायी मार्ग मर्यादित आहेत. सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई आणि सातारा या महामार्गांवरून शहरात येणारी अवजड वाहने अंतर्गत रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण करतात. विशेषतः मगरपट्टा आणि खराडी रस्त्याला जोडणारा मुंढवा येथील चंचलाताई कोद्रे पूल हा एकमेव मार्ग असल्याने येथे सातत्याने कोंडी होते आणि गंभीर अपघात घडतात. चालू वर्ष २०२६ मध्ये पुणे शहरात आतापर्यंत ३० प्राणांतिक अपघात झाले असून, त्यात ३१ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या चिंताजनक आकडेवारी आणि पोलीस प्रशासनाच्या अहवालानंतर प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी ११ जून रोजी मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ नुसार ही अधिसूचना जारी केली आहे. हा बंदी आदेश १५ जून रोजी मध्यरात्रीपासून २४ जून रोजी मध्यरात्रीपर्यंत (१० दिवस) लागू राहील. पुण्यातून दुसऱ्या शहरांकडे जाणाऱ्या जड वाहनांना शहरात प्रवेश न देता बाहेरूनच पर्यायी मार्गांनी वळवण्यात आले आहे. सोलापूरकडून मुंबईकडे जाणारी वाहने केडगाव चौफुला – न्हावरे – तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर – चाकण मार्गे किंवा उरुळी कांचन – कोरेगाव मूळ – आष्टापूर मार्गे मार्गस्थ होतील. मुंबईकडून सोलापूरकडे जाणारी वाहने तळेगाव दाभाडे – चाकण – शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे – न्हावरे – केडगाव चौफुला मार्गाचा वापर करतील. तसेच कात्रज – मंतरवाडी फाटा – वाढकी – दिवेघाट – सासवड – जेजुरी मार्गाचा वापर करता येईल. मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणारी वाहने तळेगाव, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे किंवा नाशिक फाटा – भोसरी – चाकण – शिक्रापूर – शिरूर मार्गे धावतील.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp