
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या खासगी सचिवावर गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यांच्यावर महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत संवाद साधणे तसेच बदल्यांचे रॅकेट चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे मंत्रालयीन वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, स्वतः अदिती तटकरेही यामु्ळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी अदिती तटकरे यांचे या गायकवाड सोबत काही आर्थिक लागेबांधे आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, महिला व बालविकास राज्यपत्रित अधिकारी संघटनेने एका निवेदनाद्वारे मंत्री अदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत राजेश गायकवाड यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेत. संघटनेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, राजेश गायकवाड यांच्या गैरवर्तनाबाबत नमूद मुद्दे अत्यंत गंभीर व वस्तुस्थितीदर्शक आहेत. या प्रकरणी तात्काळ दखल घेणे अत्यंत निकडीचे आहे. तसे न झाल्यास अनेक अधिकारी यांची व्यावसायिक हानी व जीवितास गंभीर धोका होईल अशी शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या तक्रारीत काय आहेत आरोप? अदिती तटकरे व गायकवाडचे आर्थिक लागेबांधे आहेत का? – रोहिणी खडसे दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. जळगाव जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे. राजेश गायकवाड हा महिला अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत बोलतो, नोकरीवरून काढण्याच्या धमक्या देतो. इतकेच नाही तर मोठमोठ्या रकमा घेऊन बदल्यांचे रॅकेटही हा गायकवाड चालवतोय महिला व बालविकास सारख्या संवेदनशील विभागात असा प्रकार घडत असेल तर हा प्रकार धक्कादायक तसेच निंदनीय आहे. गायकवाड हा 2019 सालापासून खासगी सचिव म्हणून या विभागात कार्यरत आहे, अनेक महिलांनी अनेकदा त्याच्या तक्रारी केल्या आहेत. पण मंत्री आदिती तटकरे यांनी अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. प्रश्न आहे का ? अदिती तटकरे यांचा या गायकवाडला वरदहस्त आहे का ? अदिती तटकरे यांचे या गायकवाड सोबत काही आर्थिक लागेबांधे आहेत का ? याचे उत्तर मिळाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






