बंगालच्या उपसागरात 9 मच्छिमारांचे मृतदेह सापडले: शरीर कुजल्याने ओळख पटणे कठीण; 8 दिवसांपूर्वी उलटली होती बोट; 6 अजूनही बेपत्ता

बंगालच्या उपसागरात 9 मच्छिमारांचे मृतदेह सापडले:  शरीर कुजल्याने ओळख पटणे कठीण; 8 दिवसांपूर्वी उलटली होती बोट; 6 अजूनही बेपत्ता



पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगनाजवळ बंगालच्या उपसागरात बुडालेल्या एका ट्रॉलरमधून आठ दिवसांनंतर नऊ मच्छिमारांचे मृतदेह सापडले आहेत. सहा मच्छिमार अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. ‘जय माँ काली’ नावाचा ट्रॉलर 2 जुलै रोजी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील शंकरपूर मासेमारी बंदरातून 15 मच्छिमारांना घेऊन समुद्रात मासेमारीसाठी निघाला होता. 6 जुलै नंतर ट्रॉलरशी संपर्क तुटला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, समुद्रात अनेक दिवस राहिल्यामुळे मृतदेह खूप कुजले आहेत आणि त्यांची ओळख पटवणे कठीण आहे. आता त्यांची ओळख डीएनए (DNA) तपासणीनंतरच पटू शकेल. पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफ (PMNRF) मधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आठ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर बुडालेला ट्रॉलर सापडला जिल्हा प्रशासनानुसार, पोलीस आणि भारतीय तटरक्षक दलाने आठ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शनिवारी बक्खाली किनाऱ्यापासून 35 किलोमीटर दूर बाघेर चारजवळ बुडालेल्या ट्रॉलरचा शोध लावला. रविवारी मासेमारी करणाऱ्या इतर ट्रॉलर्सच्या मदतीने तो पाथरप्रतिमा येथील सीतारामपूर किनाऱ्यापर्यंत आणण्यात आला. त्यानंतर रात्रभर चाललेल्या बचाव मोहिमेत ट्रॉलरमधून नऊ मच्छिमारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, बंगालच्या उपसागरातील खराब हवामानामुळे ट्रॉलर उलटल्याचा अंदाज आहे. तथापि, अपघाताचे खरे कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल. ओडिशाचे तीन सख्खे भाऊही बेपत्ता बेपत्ता मच्छिमारांमध्ये ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तीन सख्खे भाऊ – रवींद्र माझी (52), जयराम माझी (49) आणि जगन्नाथ माझी (45) यांचा समावेश आहे. त्यांचे नातेवाईक संन्यासी माझी यांनी सांगितले की, तिघेही यापूर्वी अनेकदा मासेमारीसाठी शंकरपूरला जात होते. अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीला ट्रॉलरवर 16 लोक जाण्याची योजना होती, परंतु एक व्यक्ती काही कारणास्तव गेला नाही. बाकीचे मृत आणि बेपत्ता मच्छिमार पूर्व मेदिनीपूर, हावडा आणि नदिया जिल्ह्यांतील रहिवासी आहेत. काकद्वीप उप-विभागीय रुग्णालयाच्या शवागाराबाहेर त्यांचे कुटुंबीय अजूनही वाट पाहत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp