digital products downloads

छत्रपती संभाजीनगरमधील अनेक भागात शुक्रवारी वीजपुरवठा खंडित: मान्सूनपूर्व दुरुस्तीसाठी महावितरणकडून कामे सुरू – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगरमधील अनेक भागात शुक्रवारी वीजपुरवठा खंडित:  मान्सूनपूर्व दुरुस्तीसाठी महावितरणकडून कामे सुरू – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगर शहरात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामांसाठी महावितरणने शुक्रवारी (17 एप्रिल) काही भागांमध्ये वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक परिसरांमध्ये ठराविक वेळेत वीज खंडित राहील, अशी माहिती महावितरणने दिली आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भीमटेकडी फीडर आणि दिल्लीगेट फीडरवरील अंबर हिल, एव्हरेस्ट कॉलेज, सईदा कॉलनी, हर्सुल गाव, कोलथनवाडी रोड, जहांगीर कॉलनी, चेतनानगर आणि फातेमा कॉलनी या भागांतील वीजपुरवठा बंद राहील. याशिवाय, सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पडेगाव उपकेंद्रावरील सर्व फीडर, निशांत पार्क फीडर आणि रेल्वे स्टेशन फीडरवरील उद्योग इंद्रकमल, स्काय सिटी, निशांत पार्क परिसर, मास्टर कुक हॉटेल, दिशानगरी, झेड गॅलेक्सी, शिवकला नेत्रालय, द्वारकादास नगर, शाहनूरवाडी आणि समाधान कॉलनी या परिसरातील वीजपुरवठा खंडित होईल. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रेल्वे स्टेशन उपकेंद्रावरील सर्व फीडर्सवरील ग्राहकांची वीज बंद राहील. तसेच, सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत म्हाडा कॉलनी, चिकलठाणा गाव, सावित्रीनगर, विमानतळासमोरील भाग, प्रकाशनगर, रामनगर, नारेगाव, एन-11, एन-12, एन-1, पॉवरलूम, गौतम दा मिल, ग्रीव्हज, सिंधी कॉलनी, खोकडपुरा, बंजारा कॉलनी, उस्मानपुरा, एसबीएच कॉलनी आणि विकास नगर या परिसरातील वीज बंद राहील. महावितरणने ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कामाच्या नियोजनानुसार, वीजपुरवठा दिलेल्या वेळेपूर्वी किंवा वेळेनंतर पूर्ववत होऊ शकतो, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp