
अनैतिक संबंधातून महिलेला बॅटने मारहाण करुन तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातीत चंदननगर भागात घडली. या प्रकरणी एका वकिलासह, त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे. पूनम दिनेश मुन (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ‘या प्रकरणी वकील ॲड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पूनमचे पती दिनेश यांनी फिर्याद दिली आहे’, अशी माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली. ॲड. सावंत यांचे पूनमशी प्रेमसंबंध होते, ॲड. सावंत यांचे चंदननगर भागातील जुन्या मुंढवा रस्त्यावर कार्यालय आहे. पूनम गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करत होती. गुरुवारी (१६ एप्रिल) सकाळी ती नेहमीप्रमाणे ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. त्यानंतर ॲड. सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि मुलीने तिला बॅटने मारहाण केली. तिच्यावर शस्त्राने वार केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात ठेवण्यात आला. रात्री आठपर्यंत पूनम घरी न परतल्याने तिच्या पतीने ॲड. सावंत यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पूनम मैत्रिणीकडे गेल्याचे सांगण्यात आले. पतीने तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पूनमचे पती शुक्रवारी सकाळी ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयाचा दरवाजा उघडा होता. पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यानंतर पूनमच्या पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पूनमच्या पतीने माहिती दिल्यानंतर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, गु्न्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार, पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चंदननगर पोलिसांनी ॲड. सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले, तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ॲड. सावंत यांची पत्नी स्वाती हिला ताब्यात घेतले. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सहा तासात गुन्ह्याचा छडा लावला. पोलिस निरीक्षक बडाख, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राम राजमाने आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






